LIC Dhan Varsha Policy: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून एलआयसीला(LIC) ओळखले जाते. एलआयसी लोकांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या विमा पॉलिसी(Policy) घेऊन येत असते. सध्या प्रत्येकाला आपल्या भविष्यासाठी बचती बरोबरच आर्थिक सुरक्षितताही(Financial security) हवी असते. तुमच्या पैशांच्या (Money) संरक्षणासाठी एलआयसीने एक खास योजना आणली आहे. ज्याचे नाव एलआयसी धनवर्षा योजना(LIC Dhan Varsha Scheme). या पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
सिंगल प्रिमियमसह मिळतील बरेच फायदे
धन वर्षा योजना(LIC Dhan Varsha Scheme) ही एक सिंगल प्रिमियम, नॉन-पार्टिसिपेटिंग, पर्सनल आणि सेव्हिंग्ज इन्शुरन्स स्कीम आहे. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागणार आहे. या योजनेत एकदा प्रिमियम(Premium) जमा करून तुम्हाला 10 पट रिटर्न्स(Returns) मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे पर्याय मिळतात. पहिल्या पर्यायात जमा केलेल्या प्रीमियमवर तुम्हाला 1.25 पटांपर्यंत रिटर्न मिळतील. जर तुम्ही 10 लाख रुपयांचा एकच प्रीमियम भरला आणि पॉलिसीधारकाचा मृत्यू(Policyholder dies) झाला तर तुम्हाला 12.5 लाख रुपयांच्या गॅरंटीड बोनसचा लाभ मिळेल. दुसऱ्या पर्यायात तुम्हाला 10 वेळा रिटर्न मिळू शकतात ज्यात तुम्ही 10 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंत रिटर्न मिळू शकतात.
ही पॉलिसी कोण खरेदी करू शकते?
तुम्ही एलआयसीची धन वर्षा पॉलिसी(LIC Dhan Varsha Scheme) 10 किंवा 15 वर्षांसाठी खरेदी करू शकता. 10 वर्षांची पॉलिसी खरेदी करण्यासाठी किमान वय 3 वर्षे आणि 15 वर्षे खरेदी करण्यासाठी किमान 8 वर्षांचे वय असणे आवश्यक आहे. धनवर्षा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून 1.25 पट परतावा मिळवण्याचे कमाल वय 60 वर्षे असून 10 पटीने परतावा मिळण्याचे कमाल वय 40 वर्षे करण्यात आले आहे. या पॉलिसीवर तुम्ही कमी व्याजदरात कर्ज सुविधेचेही सहज लाभ घेऊ शकता.