Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lesser known facts about Dhirubhai Ambani: धीरूभाई अंबानींबद्दल हे माहितीय का?

Lesser known facts about Dhirubhai Ambani

Image Source : www.thewire.in

Dhirubhai Ambani Birthday: भारतीय व्यवसायिकांचे प्रेरणा स्थान म्हणजे धीरूभाई हिराचंद अंबानी. त्यांचे कष्ट, चिकाटी आणि बुद्धीमत्तेमुळे त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रिजची पायाभरणी केली, त्याला भारतातीलच नाही तर जगातील मोठी कंपनी बनवली. आज, 28 डिसेंबर रोजी याच व्यवसाय क्षेत्रातील महान व्यक्तीची जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घ्या, त्यांच्याविषयी माहिती नसलेल्या गोष्टी!

Dhirubhai Ambani Birth Anniversary: धीरूभाई अंबानी यांनी शून्यातून विश्वनिर्मिती केली. रिलायन्स समुहाची सुरुवात करून त्याला यशाच्या शीखरावर नेऊन ठेवले. आजही प्रत्येक उद्योग, व्यवसाय करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी धीरूभाई हे आर्दश आहेत. याच आपल्या आदर्शव्यक्तीविषयी काही माहिती नसलेल्या गोष्टी -

धीरूभाई अंबानी यांचे खरे नाव काय? Real name of Dhirubhai Ambani

धीरूभाई अंबानी यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 28 डिसेंबर रोजी 1932 साली गुजरातमधल्या जुनागडयेथील चोरवाड या छोट्याशा शहरात झाला. तेव्हा त्यांचे नाव धीरू किंवा धीरूभाई नव्हते, तर धिरजलाल असे त्यांचे नाव ठेवण्यात आले होते. आज संपूर्ण जग त्यांना धीरूभाई म्हणून ओळखत असले, तरी त्यांचे खरे नाव धिरजलाल आहे.

धीरूभाई अंबानी यांचा पहिला व्यवसाय कोणता? Dhirubhai Ambani's first business?

धीरूभाई अंबानी यांनी पहिला स्टार्टअप सुरू केला. त्यांनी जुनागडमधल्या गिरनार पर्वत येथील जैन तिर्थक्षेत्रालगत स्ट्रीट फूड स्टाल उभारला. तेथे ते चाट-पकोडी  विकत असत. लहान वयात कोणताही अनुभव गाठीशी नसताना, त्यांनी हा व्यवसायही यशस्वीरित्या चालवला.

धीरूभाई अंबानी यांचा पहिला पगार किती होता? Dhirubhai Ambani's first salary?

धीरूभाई यांनी चोरवाडमध्येच आपले दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण केले. मग सोळाव्या वर्षी त्यांनी कामधंद्यासाठी भाऊ  रमणिकलाल यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. 1955 साली ते मिडल ईस्टमधील येमेन येथील ऐडनला भावाकडे गेले. तेव्हा ऐडनवर ब्रिटीशांचे राज्य होते. तेथे धीरूभाईंनी प्रसिद्ध फ्रेंच बिझनेसमॅन अँटोनिन बेसे यांच्या ए. बेसे अँड कंपनीत लिपिक अर्थात  क्लर्क (Clerk) म्हणून काम करत होते. येथे त्यांचा पगार महिना 300 रुपये होता, ही त्यांची पहिली नोकरी आणि पहिला पगार होता. येथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यांनी पार्ट टाईम गॅस स्टेशन अटेंडंटम्हणूनही काम केले.

रिलायन्सची घोडदौड! Beginnings and expansion of Reliance

1958 साली ऐडनहून परत आल्यानंतर त्यांनी मसाल्याचा व्यापार सुरू केला. मसाल्याचे पदार्थ ते येमेनला निर्यात करत असे. पुढे त्यांनी मसाल्यांच्या पदार्थांसह, पॉलिस्टर धागे निर्यात करण्यास सुरुवात केली. हा व्यवसाय त्यांनी अधिकृतरित्या चुलत भाऊ चंपकलाल दमानी यांच्यासोबत रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन या नावाने 1960 साली सुरू केला.

रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनचा व्यवसायात नफा मिळू लागल्यावर, त्यांनी पहिले ऑफिस खरेदी केले. मुंबईतील मस्जिद बंदर येथे 350 चौरस मीटरचे ऑफिस होते. यात एक टेबल, तीन खुर्च्या आणि एक टेलिफोन होता. या ऑफिसमध्ये त्यांनी एक असिस्टंटही ठेवला होता. या ऑफिसमध्ये त्यांनी रिलायन्सची टीम बनवण्यास सुरुवात केली. या टीममध्ये काही त्यांचे नातेवाईक, शाळेतले मित्र असे होते. ही टीम पुढे जाऊन रिलायन्स इंडस्ट्रीजचा पाया म्हणून भक्कमपणे उभी राहिली.

धीरूभाई यांनी रिलायन्स कंपनीचे नाव दोन वेळा बदलले. रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन या नावाने सुरुवात केली, पुढे कपडा बाजारात बराच काळ कार्यरत असल्यामुळे त्यांनी रिलायन्स टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड हे नामकरण केले, मात्र नंतर धीरूभाई सर्वच क्षेत्रात आपले पाय रोवू लागल्याने त्यांनी अखेरीज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे नाव कायम केले.

1968 साली रिलायन्सने टेक्सटाईलमधला पहिला वहिला 'विमल' हा ब्रँड लाँच केला. त्याकाळी विमल हा कपडा बाजारातला ग्लोबल लीडर ब्रँड होता. पुढे बघता - बघता रिलायन्स एक उद्योग समुह बनला. धीरूभाई अंबानी यांच्या अथक परिश्रम आणि चिकाटीने, 1996 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारे रेट केलेली रिलायन्स ही पहिली भारतीय खाजगी कंपनी ठरली. 2016 मध्ये भारत शासनाने धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.