Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

AbhiBus Offer: अभिबसची सणासुदीत बंपर ऑफर, प्रवशांना केवळ 1 रुपयांत प्रवास करता येणार

AbhiBus Offer: अभिबसची सणासुदीत बंपर ऑफर, प्रवशांना केवळ 1 रुपयांत प्रवास करता येणार

AbhiBus Offer: मर्यादित काळासाठी ही ऑफर लागू झाली असून प्रवाशांना 1 रुपयांत तिकिट बुक करता येईल. ऐन सणासुदीत इच्छित स्थळी जाण्यासाठी सवलतीच्या दरात प्रवासाची संधी उपलब्ध करुन कंपनीने ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रवाशांना ही ऑफर उपलब्ध करून घेण्यासाठी ‘लकी1’ हा कूपन कोड वापरावा लागेल.

अभिबस या भारतातील आघाडीच्या बस बुकिंग अ‍ॅपने सणासुदीच्या काळासाठी केवळ 1 रुपये एवढ्या कमी दरात प्रवास करण्याची ऑफर जाहीर केली आहे. अवघ्या 1 रुपयांत प्रवासाची ऑफर 19 ऑक्टोबर 2023 ते 25 ऑक्टोबर 2023 या काळातील प्रवासासाठी लागू आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी स्मरणीय प्रवासासाठी जाणे शक्य होणार आहे.

मर्यादित काळासाठी ही ऑफर लागू झाली असून प्रवाशांना 1 रुपयांत तिकिट बुक करता येईल. ऐन सणासुदीत इच्छित स्थळी जाण्यासाठी सवलतीच्या दरात प्रवासाची संधी उपलब्ध करुन कंपनीने ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रवाशांना ही ऑफर उपलब्ध करून घेण्यासाठी ‘लकी1’ हा कूपन कोड वापरावा लागेल.

अभिबसचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहित शर्मा म्हणाले, “सुट्टीचा काळ म्हणजे एकत्र जमण्याचा व आनंदाचा काळ असतो आणि अभिबसला या साजरीकरणाचा भाग होण्याची इच्छा आहे. आमची ‘एक रुपयाच्‍या प्रवासाची ऑफर’ हा आनंदाचा प्रसार करण्याचा व प्रवास सर्वांसाठी परवडण्याजोगा करण्याचा आमचा मार्ग आहे. 

सर्वोत्तम दर्जाची ग्राहकसेवा, तत्काळ बस बुकिंगची सुविधा, विनाकटकट रद्दीकरण, 24x7 ग्राहक सहाय्य, अखंडित प्रवास अनुभवासाठी बसचे रिअर टाइम ट्रॅकिंग करण्याची सुविधा, यांप्रती दाखवल्या जाणाऱ्या बांधिलकीसाठी अभिबस प्रसिद्ध आहे. याशिवाय अ‍ॅपमध्ये ‘पिंक सीट’नावाचे एक महत्वाचे फंक्शन आहे. याद्वारे महिला प्रवाशांना महिला प्रवाशांनी आरक्षित केलेल्या आसनालगतचेच आसन दिले जाते.