धीरूभाई अंबानी यांची जन्मदिन तारीख 28 डिसेंबर अशी आहे. या तारखेला Ambani brothers कडून औद्योगिक जगतात एखादा नवीन प्लॅन आखला जातो. यावेळी Dhirubhai's birthday निमित्त मुकेश अंबानी काय करणार आहेत ते जाणून घेऊया.
आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे 28 डिसेंबर या दिवशी नवीन कंपनी घेणार आहेत. हे अधिग्रहण जर्मन रिटेलर मेट्रो एजी कॅश अँड कॅरी (रिलायन्स मेट्रो डील) चे असणार आहे.
4 हजार कोटींहून अधिक किमतीचा असणारा हा करार जवळपास निश्चित झालेला आहे. मुकेश अंबानी 31 मेट्रो स्टोअर्सना मल्टी-ब्रँड रिटेल चेन बनवण्याचे नियोजन करत आहेत. या टेकओव्हरमुळे कार्पोरेट वर्ल्डमध्ये आणखी एका स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मेट्रो कॅश अँड कॅरीच्या अधिग्रहणासह मुकेश अंबानी राधाकिशन दमानी यांच्या रिटेल चेन डीमार्ट आणि हायपरमार्केटशी थेट स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
रिलायन्सच्या नियंत्रणाखाली काय येणार?
रिलायन्स अंदाजे 500 दशलक्ष युरो म्हणजे 4 हजार 60 कोटी रुपयांच्या डीलमध्ये मेट्रोचे इंडिया युनिट विकत घेणार आहे. यामध्ये देशातील 31 घाऊक वितरण केंद्रे, जमीन बँका आणि मेट्रो कॅश अँड कॅरीच्या मालकीच्या इतर मालमत्तांचा समावेश असणार आहे. यामुळे देशातील सर्वात मोठी रिटेलर रिलायन्स रिटेलला B2B सेगमेंटमध्ये आपले स्थान वाढवण्यास मदत होणार आहे, अशा प्रकारचे विश्लेषण तज्ञ करत आहेत.
40 हजार कर्मचाऱ्यांचे काय होणार?
रिलायन्सने भारतातील मेट्रो सुमारे 1 अब्ज डॉलर कमाईसह नफा कमवत आहे. व्यवहाराच्या कायदेशीर बाबींना अंतिम रूप दिले जात आहे. कर्मचारी आणि स्टोअरविषयी चर्चा केली जात आहे. मेट्रोच्या 4 हजार कर्मचार्यांमध्ये मालकीतील बदल आणि नवीन कामाच्या वातावरणाबद्दल काही प्रश्न आहेत, परंतु रिलायन्स त्यांना कायम ठेवण्यास उत्सुक आहे, अशी माहिती पुढे आलेली आहे. यामधील 31 पैकी बहुतांश दुकाने फायद्यात असल्याचे दिसून येत आहे.
Dhirubhai Ambani यांच्याविषयी
धीरूभाई यांचा जन्म गुजरातमधील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या गावी 28 डिसेंबर 1932 या दिवशी झाला. वडील हिराचंद गोवर्धनदास अंबाणी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या. धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य होते.
धीरुभाईंनी इ.स. 1959 या वर्षी मशीदबंदर, मुंबई येथे त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी यांच्यासह भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मिरी, लवंग, सुपारी, सुंठ, तमालपत्र, हळद, काजू इ. मसाले आणि रेयॉन कापडाचा व्यवसाय करू लागले. यात त्यांची गुंतवणूक 15 हजार रुपयांची होती.
मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह अशा भुलेश्वर येथे एका चाळीत राहू लागले.आपल्या व्यवसायाची प्रगती करत 1977 या वर्षी धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत. 2002 या वर्षी जूनमध्ये 24 तारखेला धीरूभाईंना मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने पक्षाघाताचा तीव्र झटका आला होता. पुढे 6 जुलैला धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले.