Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning: ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर अनावश्यक खर्च कशाप्रकारे टाळू शकतात? जाणून घ्या

financial planning

Image Source : https://www.freepik.com/

निवृत्तीनंतर उत्पन्न थांबलेले असल्याने अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे असते. ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर अनावश्यक खर्च कशाप्रकारे टाळू शकता, याविषयी जाणून घेऊयात.

निवृत्तीनंतर पगार बंद झाल्याने उत्पन्न थांबते. अशावेळी अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे होऊन बसते. दैनंदिन खर्चही कमी करावा लागतो. पेन्शनमुळे आर्थिक मदत होत असली तरीही ही रक्कम पगाराच्या तुलनेत निम्मीच असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आणि आरामदायी जीवनाचा आनंद घेण्यासाठी खर्चाचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. या लेखातून पेन्शनधारक खर्चात कशाप्रकारे कपात करून दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतात, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

निवृत्तीनंतर उत्पन्नाचा मार्ग बंद

निवृत्तीनंतर पगारा बंद झाल्याने आर्थिक समस्या निर्माण होते. तुम्ही जर आधीपासूनच बचत केली असल्यास अथवा पेन्शन मिळत असल्यास काहीप्रमाणात आर्थिक अडचणी दूर होतात. 

समजा, तुम्हाला निवृत्तीआधी 80 हजार रुपये पगार होता व याच पगारातून तुम्ही दैनंदिन खर्च, घर-गाडीच्या कर्जाचे हफ्ते व इतर खर्च पूर्ण करता होता. मात्र, निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन हे थेट पगाराच्या निम्मे असते.  

निवृत्तीनंतर येणारे उत्पन्न हे निम्मे झालेले असले तरीही खर्च हा तेवढाच असतो. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून पेन्शनच्या रक्कमेतच संपूर्ण खर्च भागवावा लागतो. तुम्ही योग्य व्यवस्थापन करून हा विनाकारण होणारा खर्च टाळू शकता. 

निवृत्तीनंतर अनावश्यक खर्च टाळा 

निवृत्तीनंतर उत्पन्नच निम्मे झालेले अथवा थांबले असल्याने अनावश्यक खर्च टाळावा लागतो. तुम्ही दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा खर्च टाळू शकत नसाला तरीही इतर खर्चात मात्र नक्कीच कपात करू शकता. तुम्ही काही सेवांचे सबस्क्रिप्शन घेतले असल्यास ते रद्द करू शकता. याशिवाय, जिम मेंबरशिप, ओटीटी सबस्क्रिप्शन रद्द करू शकता. तसेच, आवश्यक गोष्टींची यादी बनवून प्राधान्यक्रम ठरवा. 

कमी खर्चात करा प्रवास तुम्हाला जर निवृत्तीनंतर देशांतर्गत अथवा इतर देशांमध्ये प्रवास करायचा असल्यास आधीच तिकीट बुक करून पैसे वाचवू शकता. याशिवाय, ऑफ-सीझनच्या काळात प्रवास केल्यास तुमचा खर्चही कमी होईल. प्रवासादरम्यान खासगी वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.
घराचे भाडेतुमचे स्वतःचे घर असल्यास दरमहिन्याला भरावे लागणारे भाडे वाचू शकते. मात्र, भाड्याच्या घरात राहत असाल तर अशावेळी मोठ्या घराऐवजी लहान घर निवडावे. यामुळे तुम्हाला जास्त भाडे भरावे लागणार नाही व खर्च वाचेल.
कर्ज फेडा पेन्शनमधून येणारी काही रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरा. तुम्ही क्रेडिट कार्ड अथवा बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले असल्यास त्याची नियमितपणे परतफेड करणे गरजेचे आहे. कारण, जेवढे अधिक दिवस कर्ज फेडणार नाही, तेवढे अधिक व्याज भरावे लागेल व याचा परिणाम तुमच्या आर्थिक बजेटवर होऊ शकतो. 
कार विकानिवृत्तीनंतर कामाला जावे लागत नसल्यास कारचा सहसा वापर होत नाही. समजा, तुमच्याकडे एकापेक्षा अधिक गाड्या असल्यास त्यातील काही कार विकाव्यात. एका गाडीने तुम्ही कोठेही प्रवास करू शकता. एकापेक्षा जास्त गाड्या असल्यास मेंटेन्स व दुरुस्तीसाठी दुप्पट पैसे खर्च होतात.

आरोग्य विम्यामुळे खर्चात होईल मोठी कपात

वाढत्या वयानुसार अनेक वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले जाते. नोकरी करत असताना उपचाराचा खर्च परवडू शकतो. मात्र निवृत्तीनंतर उत्पन्नच बंद झाल्याने हॉस्पिटलचे बिल भरणे शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक खर्च हा आरोग्य सेवांवरच होत असतो. त्यामुळे तुम्ही जर आरोग्य विमा काढलेला असल्यास खर्चात मोठी कपात होईल.

निवृत्तीनंतर आरोग्य सेवांवरील खर्च टाळण्यासाठी आधीच आरोग्य व जीवन विमा काढणे गरजेचे आहे. समजा, तुम्ही जर आरोग्य विमा काढलेला नसल्यास अशावेळी खर्च टाळण्यासाठी सरकारी योजनांचा फायदा घेऊ शकता.