Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gautam Adani: हिंडेनबर्गनंतर एका नव्या वादात अडकलेल्या Karan Adani यांच्याविषयी जाणून घ्या

Karan Adani

Image Source : www.adani.com

Hindenburg ने आपला अहवाल जाहीर केल्यानंतर Adani Group समोर अनेक प्रकारची आव्हाने उभी राहिली आहेत. त्यात आता Gautam Adani यांचा मुलगा Karan Adani हेदेखील एका नव्या वादात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर करण अदानी यांच्याविषयी जाणून घेऊया.

गौतम आणि प्रीती अदानी यांना दोन मुलगे आहेत. मोठ्या मुलाचे नाव करण अदानी आणि लहान मुलाचे नाव जीत अदानी आहे.करण अदानी यांनी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातून पदवी मिळवली आहे. अदानी पोर्ट्सचे सीईओ म्हणून ते कंपनीत कार्यरत आहेत. याशिवाय अनेक कंपन्यांची जबाबदारी ते सांभाळत आहेत. 2013 मध्ये करण यांचा  विवाह भारतातील आघाडीच्या कॉर्पोरेट लॉ वकीलांपैकी एक असलेल्या सिरिल श्रॉफची मुलगी परिधी श्रॉफ यांच्याशी  झाला. करणप्रमाणेच त्याचा धाकटा भाऊ जीत अदानी यानेही परदेशात शिक्षण घेतले आहे. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, जीत 2019 मध्ये भारतात परतला आणि कंपनीच्या जबाबदाऱ्या हाताळण्यास सुरुवात केली.

करण अदानी यांच्याकडे आहे ‘या’ कंपन्यांची जवाबदारी 

2009 ममध्ये करण यांची  अमेरिकेतील  के पर्ड्यू विद्यापीठातून  अर्थशास्त्रमध्ये  पदवी पूर्ण केली आहे. ते 2017 या वर्षापासून  अदानी पोर्ट्चा कारभार बघत आहेत. अदानी पोर्ट अँड एसईझेडमध्ये  करण अदानी executive director आणि सीईओ आहेत. अदानी पोर्टचा विस्तार करण्यात ते महत्वाची भूमिका बजावत आहेत. केवळ 35 वर्षे वय असणाऱ्या करण यांच्यावर गौतम अदानी यांनी मोठी जवाबदारी सोपवली आहे. 2019 मध्ये त्यांना विमानतळ प्रकल्प प्रमुख म्हणून नियूक्त करण्यात आले आहे. 2013 मध्ये करण यांनी परिधी  श्रॉफ यांच्याशी लग्न केले आहे. परिधी  सिरील श्रॉफ यांची मुलगी आहेत. सिरील हे कायदेविषयक फार्म सिरील आमरचंद मंगलदासचे मॅनेजिंग पार्टनर  आहेत. 

हिंडेनबर्गनंतर  निर्माण झालेला हा नवा वाद काय? 

राज्याला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने यासाठी अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आर्थिक सल्लागार परिषद (EAC) स्थापन केली आहे. यात करण अदानी यांचा समावेश आहे. यात आणखीही अनेक सदस्य आहेत.  अनंत अंबानी यांची देखील यामध्ये निवड करण्यात आली आहे. मात्र हिंडेनबर्ग प्रकरणानंतर  गौतम अदानी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच या निवडीच्या बातमीने वाद निर्माण केला आहे.