Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Land Investment Tips: जमिनीत गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या

Land Investment Tips

Land Investment Tips: आजच्या घडीलाही मोठ्या प्रमाणात लोकं जमिनीमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र ही गुंतवणूक करण्याअगोदर काही बाबी तपासून पाहायला हव्यात. त्या कोणत्या ते जाणून घ्या.

Land Investment Tips: भारतीय संस्कृतीमध्ये जमिनीला अतिशय महत्त्व आहे. ‘भूमाता’ म्हणून आपण तिची पूजा करतो म्हणूनच जमिनीचा संबंध थेट समृद्धीशी जोडला गेला आहे. जमीन जितकी जास्त तितकी व्यक्ती समृद्ध असं वर्षानुवर्षे मानलं गेलं आहे. आज इतक्या वर्षांनंतरही हे समीकरण बदललेलं नाही. आपल्यापैकी अनेक जण जमिनीमध्ये गुंतवणूक(Investment in Land) करतात. जर तुम्हीही जमिनीमध्ये गुंतवणूक करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्या गोष्टी कोणत्या चला जाणून घेऊयात.

जमिनीमध्ये गुंतवणूक करत असाल तर ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या 

सुरक्षितता(Safety)

तुम्ही जी जमीन खरेदी करणार आहात ती विक्रेत्याच्या मालकीची(owned by the seller)असणे गरजेचे आहे. तुम्ही स्वत:च्या वापरासाठी जमीन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर स्थानिक पातळीवर तिची परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच वेळा सामुदायिक गतिशीलतेमुळे(Community Dynamics) बाहेरील लोकांना जमिनीचा ताबा घेणे कठीण होते.

लिक्विडिटीवर लक्ष ठेवा(Monitor liquidity)

तुम्ही गुंतवणुकीसाठी जमीन खरेदी करत असाल तर तुम्ही तिच्या लिक्विडिटीचा( liquidity)  विचार केला पाहिजे. कारण, जमीनीची विक्री करताना  तुम्हाला लिक्विडिटी समस्येचाही फटका बसू शकतो. बऱ्याच वेळा जमिनीचे ग्राहक लगेच उपलब्ध होत नाहीत. ज्यांना रिअल इस्टेट गुंतवणुकीतून झटपट आणि अतिशय जलद लिक्विडिटी हवी आहे, त्यांनी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट(REIT) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणे कधीही उत्तम मानले जाते. हे ट्रस्ट मुळात एखाद्या तज्ञ रिअल इस्टेट पोर्टफोलिओ व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केलेले फंड-सारखे कॉर्पस असून ते स्टॉक एक्सचेंजमध्ये देखील सूचीबद्ध करण्यात आलेले असतात.

प्रत्येक वेळेला चांगला परतावा मिळेलच असे नाही(not always bring good returns)

अनेक लोकांच्या म्हणण्यानुसार जमिनीत गुंतवणूक केल्यास उत्तम परतावा(returns) मिळतो मात्र हे नेहमीच खरं ठरेलच असेही नाही. आर्थिक गुंतवणुकीच्या तुलनेत भारतातील लागवडीखालील जमिनीतून मिळणारे उत्पादनही फारसे आकर्षक नाही. जर तुम्ही शेतकरी म्हणून जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक मूल्यांकन करणं गरजेचं आहे. जमिनीतून परताव्याचा मिळणारा दुसरा प्रकार म्हणजे भाडं. जर तुम्हाला स्थिर, पैसे देणारा आणि प्रामाणिक भाडेकरू सापडला तर ही तुमच्यासाठी लॉटरी असू शकते.

विकसित की ब्रँडेड जमीन?(Developed or branded land?)

बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की, तुमच्याकडे आलेली ब्रँडेड जमिनीची ऑफर स्वीकारावी का? याबाबत तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की, मी ब्रँडेड वस्तू (जमीन) खरेदी करण्यासाठी भरत असलेल्या प्रीमियमच्या बदल्यात मला काय मिळणार आहे? ही एक स्व-मूल्यांकनाची पद्धत असेल, जी  तुम्हाला प्रश्नांची उत्तरे मिळवून देण्यात मदत करेल.