Kratos X: ऑटो मोबाईलच्या जगात यावेळी इलेक्ट्रिक सेगमेंटवर जोरदार भर आहे. तीन वर्षांनंतर होणाऱ्या ऑटो एक्स्पो 2023 (Auto Expo 2023) मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. इलेक्ट्रिक टू-व्हीलर producer टॉर्क मोटर्सने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक Kratos X देखील दाखल केली आहे. Kratos X ची टेस्ट या वर्षी मार्च-एप्रिल दरम्यान सुरू होईल. याशिवाय बाइकची डिलिव्हरीही लवकरच सुरू केली जाणार आहे.
Tork Kratos X 2023 डिटेल्स (Tork Kratos X 2023 Details)
Tork Kratos X मध्ये पुन्हा डिझाइन केलेले साइड पॅनल, फास्ट चार्जिंगसह फ्युरियस फास्ट मोड, 7.0-इंच LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि अॅल्युमिनियम स्विंगआर्म फीचर्स आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Kratos X मध्ये एक पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर (Powerful electric motor) वापरण्यात आली आहे, मात्र कंपनीने याबाबत जास्त माहिती दिलेली नाही. इलेक्ट्रिक मोटरसायकल ब्लॅक-आउट बॅटरी पॅकसह (Black-out battery pack) नवीन डार्क ब्ल्यु कलर सोबत लॉंच करणार आहे.
Kratos X इलेक्ट्रिक बाईकसोबत, कंपनीने Kratos R बाईकची अपडेटेड सिरिज देखील दाखल केली आहे. यात ब्लॅक-आउट बॅटरी (Black-out battery) आणि एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील समाविष्ट आहे. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत लेआउट आणि ग्राफिक्समध्येही बदल दिसत आहेत. नवीन Kratos R जेट ब्लॅक आणि व्हाईट नावाच्या दोन नवीन कलर व्हेरियंटमध्ये (Color variant) उपलब्ध असणार आहे.
भारतात डिलिव्हरी कधी सुरू होणार….. (When will the delivery start in India?)
Kratos X इलेक्ट्रिक बाइकची डिलिव्हरी देशभरात लवकरच सुरू होईल. कंपनी आपली इलेक्ट्रिक बाइक मुंबई, हैदराबाद (Mumbai, Hyderabad) आणि पुण्यात डिलिव्हरी करत आहे. अलीकडेच कंपनीने पुण्यात पहिले Experience Center आणि हैदराबाद, सुरत आणि पाटणा (Hyderabad, Surat and Patna) सारख्या शहरांमध्ये डीलरशिप सुरू केली आहे. जूनपासून संपूर्ण भारतात त्याची डिलिव्हरी (Delivery) सुरू होईल.