Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अदानींनी खरेदी केलेल्या Kohinoor Foods ची शेअर बाजारात उसळी

Kohinoor Foods

Image Source : www.twitter.com

शेअर बाजारात शुक्रवारी Kohinoor Foods Ltd कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ बघायला मिळाली. गुंतवणूकदारांनी या शेअर्सच्या खरेदीत मोठा उत्साह दाखवला. केवळ शुक्रवारीचं नव्हे तर त्याआधीही हा शेअर चांगली कामागिरी करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसातील कामागिरीवर नजर टाकूया.

शेअर बाजारात शुक्रवारी Kohinoor Foods Ltd कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ बघायला मिळाली. गुंतवणूकदारांनी या शेअर्सच्या खरेदीत मोठा उत्साह दाखवला.  केवळ शुक्रवारीचं नव्हे तर त्याआधीही हा शेअर चांगली कामागिरी करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसातील कामागिरीवर नजर टाकूया.

Kohinoor Foods ने वर्षभरात दिला 'असा' परतावा

कोहिनुर फूड्सच्या शेअर्समध्ये 5.90 रुपयांची वाढ झाली. तब्बल 11.43 टक्के इतकी ही वाढ आहे.
आठवड्याभराच्या कामगिरीचा विचार करताना ही वाढ 7.97 टक्के म्हणजेच 4.20 रुपये इतकी आहे. वर्षभराच्या कालावधीचा विचार करताना या शेअर्सने आश्चर्यकारक परतावा दिल्याचे दिसून येते. वर्षभरापूर्वी 10 रुपयाच्या खाली (Penny stock) असणारा हा शेअर आता 57.40 रुपयांवर जाऊन पोचला आहे. तब्बल 641.94 टक्के इतकी ही वाढ आहे. गेल्या 52 आठवड्यात या शेअर्सने 7.75 रुपये इतका नीच्चांक तर 129 रुपये इतका उच्चांक गाठला आहे.

मे मध्ये अदानींनी खरेदी केली Kohinoor Foods

2022 मध्येचं मे महिन्यात गौतम अदानी यांनी  कोहिनूर फूड्सची खरेदी केली होती. हा करार झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. हा शेअर्स 35 ट्रेडिंग सेशन्समध्ये अपर सर्किटमध्ये दिसून आला. यानंतर काही काळ विक्रीही झालेली बघायला मिळाली.

 अदानी समूहाचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने  'independence'  ब्रँड अंतर्गत FMCG सेक्टरमध्ये नुकतीचं एन्ट्री घेतली आहे.

अदानी समूहासमोरचे हे एक मोठे आव्हान असल्याचे मानले जात आहे.  अदानी विल्मर लिमिटेड या कंपनीने मॅककॉर्मिक स्विट्जरलँड जीएमबीएचकडून दिग्गज कोहिनूर ब्रँडसह अनेक ब्रँड्सची खरेदीची घोषणा  मे महिन्याच्या सुरुवातीला केली होती.  भारतात कोहिनूर ब्रँड अंतर्गत रेडी टू कुक, रेडी टू ईट, करी आणि खाद्य पोर्टफोलियोसह कोहिनूर बासमती तांडूळ ब्रँडचे अधिकार कोहिनुर फूड्स कंपनीला मिळाले आहेत.

कोहिनूरची मालकी मिळवल्याने FMCG कॅटेगरीमध्ये एडब्ल्यूएलची स्थिती आणखी मजबूत होईल, असे मानले जात आहे.  Kohinoor Foods कंपनीची व्याप्ती  कोहिनूर निर्माण, व्यापार आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात मोठी आहे.

जगभरातील ग्राहकांच्या गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सप्लाय चेनची सुविधा कोहिनूर फूड्स कंपनीकडून देण्यात येते. बासमती तांदूळ,  तयार करी, रेडीमेड ग्रेवी, कुकिंग पेस्ट, चटनी, मसाले आणि सीझनिंगपासून फ्रोजन ब्रेड, स्नॅक्स, धान्य, आणि खाद्य तेलापर्यंतची उत्पादने Kohinoor Foods ची आहेत.

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)