Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paytm Share Buyback: जाणून घ्या पेटीएम बायबॅक शेअर ऑफर का आणत आहे?

Paytm Share Buyback

Paytm Share Buyback: जेव्हा एखाद्या कंपनीला वाटते की, त्यांच्या कंपनीच्या शेअर्सची व्हॅल्यू कमी झाली आहे किंवा खूपच खाली आली आहे; तेव्हा कंपनी शेअर बायबॅक ऑफर आणते.

Paytm Share Buyback: आयपीओचा मोठा गाजावाजा करत आलेली Paytmची कंपनी  One 97 Communication ने अखेर बायबॅक शेअर ऑफर आणण्याचा विचार पक्का केला आहे. कंपनीने गुरूवारी (दि.8 डिसेंबर) बायबॅकच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी 13 डिसेंबरला बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. कंपनीच्या बायबॅक ऑफरचा गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतो, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

शेअर बायबॅक म्हणजे काय?

जेव्हा एखादी लिस्टिंग झालेली कंपनी भागधारकांकडून शेअर्स खरेदी करते; तेव्हा या प्रक्रियेला शेअर बायबॅक म्हटले जाते. ज्याला साध्यासोप्या मराठी भाषेत शेअर पुनर्खरेदी म्हणतात.


पेटीएम शेअर बायबॅक का करत आहे?

पेटीएमचा आयपीओ लिस्टिंग झाल्यानंतर त्याच्यात 75 टक्क्यांनी घसरण झाली आहे. आयपीओची किंमत 2150 रुपये होती; ती आता 540 रुपयांवर आली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचे बाजारातील भांडवल 70 हजार कोटी रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे कंपनी शेअर बायबॅकचा निर्णय घेतला असेल, असे बोलले जाते. पेटीएमने शेअर बायबॅकचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यात 6.5 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. कंपनीने 2021 मध्ये आयपीओच्या माध्यमातून 18,300 कोटी जमा केले होते.

पेटीएमची आर्थिक स्थिती काय आहे?

पेटीएमला 2021-22 मध्ये 2,325 कोटी रुपये तर 2022-23च्या जूनच्या तिमाहीत 628 कोटी रुपये आणि सप्टेंबरच्या तिमाहीत 588 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षभरात One 97 Communicationचे बाजारातील भांडवल 70 हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे कंपनीची सध्याची स्थिती खूपच वाईट असल्याचे सांगितले जाते.

Paytm कडे बायबॅकसाठी पुरेसा निधी आहे का? असा प्रश्नही उपस्थित होतोय. यावर पेटीएमचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे शेअर बायबॅकसाठी 9,182 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. पण याबाबत तज्ज्ञांमध्ये साशंकता आहे. कारण गेल्या काही दिवसांत कंपनीला काहीच नफा होत नसल्याचे दिसून येत आहे.