Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा? वृद्ध नागरिकांनी याची तरतूद का करायला हवी? वाचा

Emergency Fund

Image Source : https://www.freepik.com/

अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगासाठी आर्थिकरित्या तयार असणे गरजेचे आहे. अशा स्थितींना सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन निधीची तरतूद केलेली असावी.

अनेकदा पैशांची तातडीची गरज असते, मात्र कोणतीही बचत केलेली नसल्यामुळे इतरांकडून कर्ज घ्यावे लागते. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन स्थितीमध्ये आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगासाठी आर्थिकरित्या तयार असणे गरजेचे आहे. अशा स्थितींना सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन निधीची (Emergency Fund) तरतूद केलेली असावी.

उत्पन्न थांबलेले असल्याने वयोवृद्धांसाठी आपत्कालीन निधी आर्थिक आधार असतो. ज्येष्ठ नागरिकांनी आपत्कालीन निधीची तरतूद करणे का गरजेचे आहे? याविषयी या लेखातून जाणून घेऊयात.

निवृत्तीनंतर खर्च-बचतीचे आर्थिक नियोजन गरजेचे

नोकरी करत असताना व निवृत्तनंतरही खर्च व बचतीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. निवृत्तीनंतर पगार थांबवला असल्याने योग्य आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. आर्थिक नियोजनामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो व उत्पन्नातील काही रक्कम आपत्कालीन निधीमध्ये जमा करता येते. निवृत्तीनंतरही तुम्ही येणाऱ्या उत्पन्नातील काही रक्कम आपत्कालीन निधीमध्ये जमा केल्यास अडचणीच्या काळात याचा फायदा होऊ शकतो.

आपत्कालीन निधी किती असायला हवा?

निवृत्तीनंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी आत्तकालीन निधीची तरतूद करायला हवी. हा निधी किती असायला हवा, हे तुमच्या खर्चावर अवलंबून आहे. हॉस्पिटल, प्रवास व दैनंदिन गरजा यानुसार आपत्कालीन निधी ठरवू शकता.

समजा, तुमचा महिन्याचा खर्च 40 हजार रुपये आहे. अशावेळी भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या व पुढील 6 महिन्यांचा खर्च विचारात घेऊन कमीत कमी अडीच ते लाख रुपयेत आपत्कालीन निधीत जमा असायला हवे. तुम्ही आपत्कालीन निधीतील रक्कम सोने, मुदत ठेवी अथवा इतर जोखीम नसलेल्या योजनांमध्येही गुंतवू शकता. ज्यामुळे गरज पडल्यास त्वरित त्याचा वापर करता येईल.

निवृत्तीनंतर आपत्कालीन निधीची त्वरित व्यवस्था कशी कराल?

गुंतवणूकनोकरी करत असतानाच वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची सवय लावायला हवी. सोन्यापासून ते स्टॉक्सपर्यंत अशा विविध गोष्टीत केलेली गुंतवणूक भविष्यात कामास येते. निवृत्तीनंतर याच गुंतवणुकीचा वापर करू शकता.
मित्र-मैत्रिणींची घ्या मदतअचानक उद्भवलेल्या अडचणीच्या काळात पैशांची गरज असल्यास मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्यांची मदत घेऊ शकता. 
कर्ज कोणत्याही स्थितीमध्ये कर्ज काढणे हा शेवटचा पर्याय असावा. तुमच्याकडे एकही रुपया आपत्कालीन निधी म्हणून जमा नसल्यावरच हा मार्ग वापरावा. तसेच, हे कर्ज तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शन अथवा इतर उत्पन्नाच्या माध्यमातून नियमित फेडावे.

निवृत्तीनंतर आपत्कालीन निधीची गरज काय?

आजारपणात मदतकोव्हिड-19 च्या काळात विमा व आपत्कालीन निधीचे महत्त्व सर्वांना पटले आहे. अचानक उद्भवणारा आजार अथवा अपघाताच्या स्थितीमध्ये पैशांची गरज असते. अशावेळी आपत्कालीन निधी आधार ठरतो.
प्रवासासाठी उपयोगीफॅमिली इमर्जेंसी अथवा अनपेक्षित परिस्थितीत कधीही प्रवासाची गरज भासू शकते. कोणत्याही कारणास्तव प्रवास करायचा असल्यास अशावेळी आपत्कालीन निधीचा वापर करू शकतो.
मुलांचे शिक्षण-लग्नासाठीमुलांचे शिक्षण अथवा लग्नासाठीही पैशांची गरज भासते. अशावेळी आपत्कालीन निधीचा वापर करू शकता. 
व्यवसायासाठी होईल मदतव्यवसाय करताना उद्भवाणाऱ्या कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्याची तयारी असायला हवी. अनपेक्षित खर्च, आर्थिक मंदी व इतर गोष्टींमुळे व्यवसायात नुकसान होऊ शकते. अशावेळी आपत्कालीन निधी असल्यास व्यवसाय पुन्हा सुरळीत चालू ठेवण्यास मदत होईल.