भारत-चीन सीमा विवादामुळे (इंडो-चायना LAC विवाद) भारताने प्रतिबंधित केलेल्या 58 हून अधिक चिनी अॅप्समध्ये एक लहान व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉक (tiktok) देखील आहे. 29 जूनपासून चायनीज अॅप्सवर बंदी घालण्यात आली. त्यावेळी आपले कौशल्य कुठे सादर करावे? असा प्रश्न टिकटॉकस्टार्सना (Ticktokers) पडला होता. मात्र, यादरम्यान, अनेक भारतीय सोशल मीडिया अॅप्स समोर आले, ज्यामध्ये रोपोसो, मित्रॉन आणि बोल इंडिया हळूहळू भारतीय वापरकर्त्यांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत.
युट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकचा आधार
दरम्यान बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की या बंदीचा टिकटॉक स्टार्सवर खूप वाईट परिणाम झाला असावा. ते आता त्यांचा कंटेंट कुठे पोस्ट करतील, त्यांना ते कसे पाहता येईल आणि टिकटॉकच्या मासिक उत्पन्नाचे काय होईल? वास्तविक, टिकटॉक स्टार्स एकाच प्लॅटफॉर्मवर सक्रिय नव्हते. गेल्या काही वर्षांमध्ये, या सेलिब्रिटींनी यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या फॉलोअर्ससह मजबूत नातेसंबंध निर्माण केले आहेत. भारतातील सर्वात मोठे टिकटॉकर्स यशस्वी युट्यूब चॅनेल आणि इन्स्टा आयकॉन देखील आहेत. त्याचा ग्राहकवर्गही टिकटॉकचा आहे. म्हणजेच, त्याचे लाखो चाहते त्याला त्याच्या इतर चॅनेल आणि प्लॅटफॉर्मवर फॉलो करतात. टिकटॉकसह 58 चिनी अॅप्सवर भारतात बंदी घालताच या सेलिब्रिटींनी पाहिले की त्यांच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलोअर्स आणि सब्सक्राइबर्सची संख्या वेगाने वाढू लागली.
रोपोसो, चिंगारी, मित्रों, बोल इंडिया, शेयरचॅट
भारताने टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर बेरोजगार झालेल्या अनेक टिकटॉकस्टार्सनी आपला मोर्चा भारतीय बनावटीच्या अँप्सक़डे वळवला आहे. यामध्ये रोपोसो, चिंगारी, मित्रों, बोल इंडिया, शेयरचॅट आदिंचा समावेश आहे. चिंगारी हे अँप नोव्हेंबर, 2018 पासून गूगल प्ले तर 2019च्या जानेवारीपासून अॅपल स्टोरवर उपलब्ध आहे. हे अॅप इंग्रजीसह फक्त हिंदी, मराठी, तेलगू, तमिळ, गुजरात इत्यादी भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. चिंगारीप्रमाणेच रोपोसो, मित्रों, बोल इंडिया, शेयरचॅट या अँप्सच्या माध्यमातून टिकटॉकस्टार्स आपली कला सादर करत असून लाखो रुपये कमवत आहेत.