देशातील सर्वात मोठी कार कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुतीने नवीन बलेनोला आणखी चांगली बनवण्यासाठी नवीन अपडेट दिलेले आहे. या अपडेटमुळे प्रीमियम हॅचबॅकमध्ये नवीन फीचर्स आली आहेत. याचा फायदा सध्याच्या ग्राहकांना तर होणार आहेच, त्याचबरोबर नवीन ग्राहकांना देखील होणार आहे.
मारुतीने प्रीमियम हॅचबॅक बलेनोसाठी (Maruti Baleno) नवीन सॉफ्टवेअर अपडेट आणले आहे. या अपडेटमुळे कारला 9 इंच स्मार्ट प्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये Apple कार प्ले आणि Android Auto साठी सपोर्ट मिळणार आहे. मात्र, यामध्ये कारच्या फक्त झेटा आणि अल्फा व्हेरियंटलाच सॉफ्टवेअर अपडेटचा लाभ मिळणार आहे. कंपनीने अपडेट्स ओव्हर द एअर ऑफर केलेले आहेत.
या नवीन अपडेटनंतर कारला ऑटो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हेड-अप डिस्प्लेवर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि instrument क्लस्टरमध्ये मल्टी इन्फोटेनमेंट डिस्प्ले येईल. डीलरशिपला भेट देऊन हे नवीन फीचर्स समजून घेता येतील. tतसेच अपडेटही केली जाऊ शकता येणार आहेत.
जुन्या बोलेनोच्या तुलनेत अनेक बदल
सध्याची Maruti Baleno फेब्रुवारी 2022 मध्येच लॉन्च करण्यात आली होती. जुन्या बलेनोच्या तुलनेत यात अनेक बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, हेड्स-अप डिस्प्ले, सुझुकी कनेक्ट, क्रूझ कंट्रोल, रियर एसी व्हेंट्स, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग, अँटी पिंच विंडो यांसारख्या अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. Maruti Baleno च्या माध्यमातून कंपनी तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
कंपनीने बलेनोचे सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा व्हेरियंट कंपनीने ऑफर केले आहेत. ते 6.49 लाख रुपयांपासून उपलब्ध होतात. बलेनोच्या या नवीन अपडेटचा सध्याच्या आणि पुढील ग्राहकांनाही लाभ होणार आहे.