Petrol Diesel Price Today: आज 2 जानेवारीला सकाळी 6 वाजता, सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार, देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किंमतींत मोठा बदल झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. आपण महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील पेट्रोलचे दर काय आहेत, हे जाणून घेऊयात.
पेट्रोल व डिझेलचे दर कसे ठरतात?
पेट्रोलच्या किंमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत. त्यामुळे नियमितपणे पेट्रोलचे दर बदलत असतात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर केले जाते. पेट्रोलची किंमत ही अनेक घटकावरून ठरवितात. जसे की, रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी यानुसार. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होते, तेव्हा भारतात इंधनाच्या किंमतीत वाढ केली जाते.
पेट्रोल व डिझेलचे दर
मुंबई शहर पेट्रोल - 106.31 रूपये प्रति लिटर डिझेल 94.27 रूपये
नाशिक पेट्रोल - 106.06 रूपये प्रति लिटर डिझेल 92.58 रूपये
पुणे पेट्रोल -  106.67 रूपये प्रति लिटर डिझेल 93.16 रूपये
ठाणे पेट्रोल - 105.86 रूपये प्रति लिटर डिझेल  92.36 रूपये
कोल्हापूर पेट्रोल - 106.73 रूपये प्रति लिटर डिझेल रु. 93.25 रूपये
अहमदनगर- पेट्रोल - 106.24 रूपये प्रति लिटर डिझेल  92.77 रूपये
औरंगाबाद पेट्रोल - 106.26 रूपये प्रति लिटर डिझेल 92.77 रूपये
धुळे पेट्रोल - 106.04 रूपये प्रति लिटर डिझेल 92.57 रूपये
पेट्रोल - डिझेलच्या किंमती एसएमएसवर (SMS)
तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल व डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारे पाहता येणार आहे. जसे की, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP 9224992249 वर पाठवू शकता किंवा HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE पाठवू शकता किंवा BPCL (BPCL) ग्राहक RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            