Sale Of Houses: भारतात मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या सतत वाढत आहे. मागील तिमाहीत निवासी घरांच्या संख्येत 11 टक्के वाढ झाली असल्याची माहिती रेटिंग एजन्सीकडून मिळाली आहे. ही वाढ देशातील टॉप 7 शहरांमध्ये नोंदवली आहे. रेटिंग एजन्सी ICRA च्या अहवालानुसार शहरांमध्ये एकूण 149 दशलक्ष चौरस फूट निवासी जमीन विकली गेली आहे, जी गेल्या 10 वर्षांतील तिसऱ्या तिमाहीमध्ये सर्वाधिक आहे.
2022- 23 मधील विक्री किती?
2021- 22 मधील पहिल्या तिमाहीमध्ये विक्री 307 दशलक्ष चौरस फुट होती आणि 2022-23 मध्ये 412 दशलक्ष चौरस फुट झाली आहे. रेटिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि एनसीआर क्षेत्र आणि पुणे येथे निवासी Residential Flats च्या विक्रीत वाढ होत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत या शहरांमध्ये लक्झरी आणि मध्यम फ्लॅटच्या विक्रीत 16 टक्के आणि 42 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये ती 14 टक्के आणि 36 टक्के वाढ झाली होती.
नवनवीन डिझाईनचे घर घेण्यामागे अनेकांचा कल
ICRA च्या उपाध्यक्षा अनुपमा रेड्डी यांच्या मते, ही तेजी आर्थिक वर्ष 2023-24 मध्येसुद्धा कायम राहणार आहे. येत्या वर्षात निवासी रिअल इस्टेटमध्ये 8 ते 12 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्याच वेळी, 2024 या आर्थिक वर्षात ते 14 ते 16 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. यासोबतच लोक मोठ्या शहरांमध्ये मोठ्या घरांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. यासोबतच त्या म्हणाले की, रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर गृहकर्ज महाग झाले आहेत. यानंतरही लोक प्रॉपर्टीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. यासोबतच ते म्हणाल्या की, बाजारात नोकऱ्यांचा अभाव आणि वाढत्या व्याजदराचा काही परिणाम येत्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रात दिसू शकतो. वाढत्या महागाई सोबतच अपेक्षा सुद्धा वाढल्या आहेत. एक घर असतांना सुद्धा त्याची रचना आवडली नाही, म्हणून दुसरे घर खरेदी केले जाते. नवनवीन डिझाईनचे घर घेण्यामागे अनेकांचा कल आहे. राहत असलेले घर विकून त्यापेक्षा चांगले घर घेऊ हा विचार अनेक लोक करतात आणि मग त्यासाठी होईल ते प्रयत्न सुद्धा सुरू ठेवतात. किमती वाढल्या असल्या तरीही प्रत्येकाचा विचार हाच असतो की, चांगलं पाहिजे आहे तर मग पैसे मोजावे लागतील. यामुळे घर खरेदीच्या टक्केवारीमध्ये दिवसेंदिवस वाढ दिसून येत आहे.