मानवी आयुष्यचक्रातील सर्वात अनिश्चित गोष्ट म्हणजे आयुष्याचा शेवट कधी, कोठे आणि कसा होणार, याबाबत मानवाला असणारे अज्ञान. आयुष्याच्या पसाऱ्यातून बाहेर पडण्याचा “Exit time” माहीत नसणे, हे आपल्या मनाला कायम पडत आलेले कोडे आहे. आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांवर कोसळणारा दुःखाचा आणि आर्थिक संकटाचा काळ पहायला व्यक्ती जगात नसते. मात्र त्याने त्याच्या हयातीमध्ये घेऊन ठेवलेली इन्शुरन्स पॉलिसी तेव्हा त्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार आणि सुरक्षित भविष्य देऊ शकते.
Table of contents [Show]
इन्शुरन्स पॉलिसी घेऊन मला काय फायदा?
जेव्हा आपण एखादी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करतो, तेव्हा आपल्या आणि लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये एक लिखित स्वरूपाचा करार अस्तित्वात आलेला असतो. पॉलिसीधारक त्याच्या हयातीमध्ये प्रिमिअमच्या रूपाने एक प्रकारची गुंतवणूक करतो, त्याचा लाभ त्या पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला किंवा त्याच्या कायदेशीर वारसाला मिळत असतो. “लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेऊन मला काय फायदा !!! इन्शुरन्स कंपनी माझे पैसे घेणार आणि देणार तर माझ्या घरच्यांना आणि ते देखील माझ्या मृत्यूनंतर”, असा बहुतांश लोकांचा समज (खरे तर गैरसमज !!!) असतो. आर्थिक सुरक्षितता देणे, हा जरी लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा मुख्य उद्देश असला तरी तो एकमेव उपयोग नसतो. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला आपला आय-कर अर्थात इन्कम टॅक्स (Income Tax) वाचविण्यासाठी देखील तेवढीच उपयुक्त ठरत असते.
Life Insurance Maturity Tax Rules: जीवन विम्याची मॅच्युरिटी पूर्णपणे करमुक्त असते का?
इन्शुरन्सवर टॅक्समध्ये 1.5 लाखांपर्यंत मिळते सवलत!
संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये आपण जी रक्कम लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम म्हणून भरत असतो, त्या रकमेवर भारतीय आयकर कायदा, 1961च्या (Income Tax Act) सेक्शन 80C अन्वये सूट प्राप्त करून घेऊ शकतो. 80C सेक्शनच्या अंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर आपण टॅक्स भरण्यापासून वाचवू शकतो. कलम 80C आपल्याला आपल्या जीवनाचा, आपल्या जोडीदाराला, किंवा आपल्या अपत्याच्या जीवनाचा इन्शुरन्स काढण्यासाठी भरलेल्या प्रीमिअममध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अटींच्या अधीन राहून करकपात करण्याची परवानगी देते. आपले अपत्य अवलंबून किंवा स्वतंत्र, अल्पवयीन अथवा सज्ञान, विवाहित अथवा अविवाहित असले तरी देखील, कलम 80C करातून वजावट मिळते. आणि ही सूट व्यक्ती तसेच HUF - Hindu Undivided Family अर्थात हिंदू अविभक्त कुटुंबे, या दोघांनाही उपलब्ध आहे.
Tax Saving Tips: हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून घेऊ शकता कर बचतीचा लाभ, कसा ते जाणून घ्या
नाही तर टॅक्समधून सूट मिळणार नाही...
जीवन विमा उत्पादनांव्यतिरिक्त पेन्शन फन्ड (ऍन्युइटी प्लॅन) मध्ये देखील दर वर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास भारतीय आय कर कायदा, 1961 १९६१ च्या (Income Tax Act) सेक्शन 80CCC अन्वये सूट प्राप्त होते. मात्र जेव्हा पॉलिसीचा प्रीमियम हा पॉलिसीच्या रक्कमेच्या 20 टक्के पेक्षा जास्त (जर 1 एप्रिल 2012 पूर्वी खरेदी केली असल्यास) किंवा 10 टक्क्यांपेक्षा जास्त (जर पॉलिसी 1 एप्रिल 2012 च्या नंतर खरेदी केली असल्यास) असल्यास मिळणाऱ्या रक्कमेवर कर लागतो. तेव्हा करामधून सूट मिळत नाही.
नॉमिनीला मिळणारी रक्कम टॅक्स फ्री असते!
एवढेच नाही तर, इन्शुरन्स पॉलिसीच्या मुदतपूर्तीवर (पॉलिसी matured झाल्यावर) मिळणारी रक्कम किंवा बोनस म्हणून प्राप्त झालेली रक्कम देखील इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त समजली जाते. पॉलिसी कालावधीमध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला असता मिळणारी रक्कम म्हणजे “Sum Assured” देखील कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त असते. थोडक्यात, नॉमिनीला मिळालेल्या रकमेवर कोणताही टॅक्स लागत नाही. याचसोबत पगारदार नसलेल्या व्यक्ती, HUF, संघटना, ट्रस्टस्, कंपनीज् देखील अशा तरतुदीअंतर्गत सवलतीचा दावा करू शकतात.
Penny saved is penny earned अर्थात “पैसा वाचविणे म्हणजे पैसे कमविणे”. ही उक्ती लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्टमध्ये केलेल्या गुंतवणुकीसाठी लागू पडते.