Price of the Crown on the Head of Miss Universe : न्यू ऑर्लिन्स शहरात 71 व्या मिस युनिव्हर्स (Miss Universe) स्पर्धा नुकतीच पार पडली. ज्यामध्ये जगभरातील 85 स्पर्धकांनी भाग घेतला होता, परंतु अमेरिकेच्या ‘आर बॉन गॅब्रिएल’ (R' Bonney Gabriel) ने 84 स्पर्धकांना मागे टाकत मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावावर केला. तुम्हाला माहिती आहे का, तिने जिंकलेल्या तिच्या डोक्यावरील असलेल्या ताजची किंमती किती आहे?
मिस युनिव्हर्सच्या ताजची किंमत (The Cost of The Miss Universe Crown)
2023 ची मिस युनिव्हर्सचा किताब अमेरिकेच्या ‘आर बॉन गॅब्रिएल’ने जिंकला. तिच्या डोक्यावर अत्यंत शानदारपणे मिस युनिव्हर्सचा ताज चढविण्यात आला. तिच्या या ताजची किंमत 6 दशलक्ष डॉलर्स आहे, जी भारतीय चलनानुसार 49 कोटी रुपये आहे. या ताजचे नाव 'फोर्स फॉर गुड' असे असून तो मौवाड नावाच्या नामांकित कंपनीनव्दारे तयार करण्यात आला. या ताजमध्ये अनेक सुंदर व आकर्षक हिरे व नीलम बसविण्यात आले आहे. या ताजमध्ये 993 स्टोनचा समावेश आहे.
टॉप 3 मधील स्पर्धक (Top 3 Contenders)
मिस युनिव्हर्स विजेत्याच्या घोषणेनंतर, माजी भारतीय मिस युनिव्हर्स हरनाझ संधू यांनी मिस युनिव्हर्स विजेती आर बॉन गॅब्रिएल हिला मुकुट घातला. मात्र, व्हेनेझुएलाची अमांडा डुडामेल न्यूमन, अमेरिकेची आर बॉनी गॅब्रिएल आणि डॉमिनिकन रिपब्लिकची अँड्रिया मार्टिनेझ यांनी टॉप 3 च्या यादीत आपले स्थान निश्चित केले होते. दुसरीकडे, या स्पर्धेच्या कॉस्च्युम फेरीत सुवर्ण पक्षी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणारी दिविता राय (Divita Rai) टॉप 16 मध्ये पोहोचली, पण तिला टॉप 3 मध्ये स्थान मिळवता आले नाही. मात्र, यावेळी तिने सोनेरी पक्षी बनून सर्वांची मनं नक्कीच जिंकली आणि तिचा ड्रेस ही खूप चर्चेत राहिला.
भारताला 3 ताज मिळाले (India Won 3 Crowns)
तुम्हाला माहिती का, भारताला आतापर्यंत 3 वेळा मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे. 1994 मध्ये पहिल्यांदा बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला मिस युनिव्हर्सचा ताज चढवण्यात आला होता. यानंतर 2000 मध्ये लारा दत्ताने मिस युनिव्हर्सचा मान मिळविला आणि त्यानंतर 2021 मध्ये हरनाज संधूने भारतासाठी तिसरा किताब जिंकला.