How to Apply For Miss Universe: मिस युनिव्हर्स स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. अमेरिका येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ‘आर बॉनी ग्रॅबियल’ (R'Bonney Gabriel) हिने या स्पर्धेचा ताज जिंकला. मात्र या स्पर्धेत कसे सहभागी व्हायचे, हे बऱ्याच मुलींना माहिती नसते. चला, तर मग मिस युनिव्हर्स या स्पर्धेत कसे सहभागी व्हायचे, याबद्दल अधिक जाणून घेवुयात.
मिस दिवा (Miss Diva)
तुम्हाला सर्वप्रथम ‘मिस दिवा ब्युटी’ (Miss Dive Beauty)नावाची स्पर्धा जिंकावी लागते. फेमिना मिस इंडिया (Femina Miss India) हे असोसीएशन हे भारताकडून मिस युनिवर्ससाठी कोण रिप्रेझेंट करेल हे ठरविते. जी प्रामुख्याने चार मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्युटी स्पर्धांपैकी एक असते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही निकष आहेत. जसे की उंची, वय, नॅशनॅलिटी आदि.. या निकषांच्याआधारे तुम्ही जर पात्र ठरलातं तर तुम्ही या स्पर्धेसाठी अर्ज करू शकता.
मिस दिवासाठी पात्रता (Eligibility for Miss Diva)
मिस दिवा या स्पर्धेसाठी तुम्ही सर्वप्रथम भारताचे नागरिक असणे अनिवार्य आहे तुमचे वय 18 ते 27 पर्यंत असावे लागते. तुम्ही अविवाहित असला पाहिजे. तसेच कोणाचे पालकत्व तुमच्याजवळ नसले पाहिजे. तृतीयपंथी यासाठी अर्ज करू शकत नाही. तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट असणे आवश्यक आहे.
मिस दिवासाठी असा करा अर्ज (Apply like this for Miss Diva)
सर्वप्रथम www. missdiva. com ही ऑफिशियल वेबसाईट जावे. येथे रजिस्ट्रेशन करून सर्व नियम आणि अटी नीट वाचावेत.पहिले फॉर्ममध्ये आपली वैयक्तिक माहिती अचूक भरा. यामध्ये तुम्हाला 3 क्लोज-अप फोटो अपलोड करावे लागतात. जसे की, (उजवीकडून, डावीकडून अन् समोरून मिड शॉट आणि लॉन्ग शॉट) जर त्यांच्या सर्व अटी व नियमांशी सहमत असाल, तर तो फॉर्म अपडेट करून सबमिट करा. जर तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्मची निवड झाली, तर तुम्हाला तुमच्या ऑडिशनसाठी कळवले जाईल. जर तुम्ही ‘मिस दिवा ब्युटी’ ही स्पर्धा जिंकली तर तुम्ही ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करू शकता.