बाजारात एक नवीन स्मार्टफोन दाखल झाला आहे. Honor X5 हा फोन 5000 mAh बॅटरीसह लाँच करण्यात आलेला आहे. याची किंमत, डिस्प्ले आणि इतर वैशिष्ट्ये जाणून घ्या.
Honor X5 मध्ये 6.5 इंच एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. फोनला मीडियाटेक हेलिओ 25 प्रोसेसर आणि 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज देण्यात आलेले आहे.
स्मार्टफोन ब्रँड ऑनरने आपला नवीन स्वस्त स्मार्टफोन ऑनर एक्स 5 लाँच केलेला आहे. हा फोन जागतिक बाजारात दाखल केला गेला आहे. फोनला 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप आणि 5,000 एमएएच बॅटरी आहे. 6.5 इंच डिस्प्लेसह सुरक्षिततेसाठी फोनमध्ये एक फेस अनलॉक फीचर आहे.
Honor X5 ची किंमत
Honor X5 हा स्वस्त फोन आहे. Smartphone under 10000 मध्ये याचा समावेश करता येईल.
ओशन ब्लू, मिडनाइट ब्लॅक कलर यासारख्या ऑप्शन्समध्ये हा फोन येतो. जागतिक बाजारात हा फोन दाखल झालेला आहे. त्याच्या 2 जीबी रॅमसह, 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटच्या किंमत 99 युरो म्हणजेच सुमारे 8,700 रुपये इतकी आहे.
Honor X5 ची अन्य वैशिष्ट्ये
ऑनर एक्स 5 मध्ये 6.5 इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे, जो वॉटरड्रॉप नॉच डिझाइनमध्ये येतो. फोनसह मागील बाजूस लेदर टेक्स्चर उपलब्ध आहे. फोनला मीडियाटेक हेलिओ जी 25 प्रोसेसर आणि 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज मिळते. फिंगरप्रिंट सेन्सर फोनमध्ये सपोर्ट करत नाही. परंतु सुरक्षेसाठी फेस अनलॉक हे फीचर देण्यात आलेले आहे.
कॅमेरा आणि बॅटरी
ऑनर एक्स 5 ला एकच मागील कॅमेरा मिळतो, जो 8 मेगापिक्सेल असा आहे. एलईडी फ्लॅश आणि 1080 पिक्सेल व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी कॅमेरा सपोर्ट करतो. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5 -मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 5,000 एमएएच बॅटरी आहे. फोनमध्ये मायक्रो-यूएसबी पोर्ट, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, 4 जी व्होल्टे, वाय-फाय, ब्लूटूथ आणि कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम सपोर्ट आहे.