Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Infinix zero Ultra 5G आज स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये?

Infinix zero Ultra 5G

Image Source : www.fonearena.com

Infinix zero Ultra 5G : स्मार्टफोन ब्रँड Infinix कडून अलीकडेच भारतात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Infinix Zero Ultra 5G लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन आज पहिल्यांदाच खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यासोबतच फोनवर उत्तम ऑफर्सही उपलब्ध असून याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

स्मार्टफोन ब्रँड Infinix कडून अलीकडेच भारतात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Infinix Zero Ultra 5G लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन आज पहिल्यांदाच खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला  आहे. यासोबतच फोनवर उत्तम ऑफर्सही उपलब्ध असून याविषयी सविस्तर जाणून घेऊया. 

Infinix Zero Ultra 5G च्या 8 GB RAM सह 256 स्टोरेज वेरिएंटची किंमत 49 हजार 999 रुपये इतकी आहे.  मात्र, हा फोन फ्लिपकार्टवर 40 टक्के डिस्काउंटसह 29 हजार 999 रुपयांमध्ये आहे. फोनवर कॅशबॅक, बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध असल्याचे दिसत आहे.  याचाच अर्थ ऑफरसह फोन 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. Infinix Zero Ultra 5G Coslight Silver आणि Genesis Noir या दोन रंगांमध्ये खरेदी करता येतो.

Infinix Zero Ultra 5G या फोनवरील ऑफर 

8 जीबी रॅमसह फोनचा 256 स्टोरेज प्रकार फ्लिपकार्टवर 40 टक्के डिस्काउंटसह 29 हजार 999 रुपयांना लिस्ट करण्यात आलेला आहे. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड किंवा फेडरल बँक क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास 10 टक्के तात्काळ सूट मिळणार आहे.

तसेच, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध असणार आहे. एवढेच नाही तर फोनसोबत 17 हजार 500 रुपयांची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. म्हणजेच सर्व ऑफर्ससह फोन अगदी कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.

Infinix Zero Ultra 5G चे स्पेसिफिकेशन

Infinix Zero Ultra 5G मध्ये 6.8-इंचाचा HD Plus 3D वक्र AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 nits ब्राइटनेस  उपलब्ध आहे. फोनमध्ये 6 एनएम ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेन्सिटी 920 प्रोसेसरसह 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसाठी सपोर्ट आहे. RAM  13 GB पर्यंत वाढवता येते. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 2 टीबी पर्यंत वाढवता येईल.

या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.  यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) च्या सपोर्टसह 200-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे. दुय्यम कॅमेरा 13 मेगापिक्सेल आणि तिसरा लेन्स 2 मेगापिक्सेल असा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा येतो. फोनमध्ये 4,500 mAh बॅटरी आणि 180 वॉट थंडर फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीने असा  दावा केला आहे की फोन फक्त 12 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो.