FD Interest Rates: रेपो दर वाढवल्याचा परिणाम एफडीच्या व्याजदरांवर होतो. रेपो दर वाढवल्याचा परिणाम एफडीच्या व्याजदरांवर होतो. बँकांमध्ये मुदत ठेवी (FD) करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी 2022 हे वर्ष खूप चांगले आहे. कारण बँका मे 2022 पासून FD व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत (Bank FD Rate Hike). रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाही रेपो दरात सातत्याने वाढ करत आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजीही मध्यवर्ती बँकेने रेपो दरात 0.5% वाढ केली होती. कोणकोणत्या बँकानी व्याजदरात वाढ केली? सर्वाधिक वाढ कोणत्या बँकेने केली हे जाणून घेऊया.
Table of contents [Show]
व्याजदरात वाढ (Interest rates)
आरबीआयने (RBI) व्याजदर वाढवल्यानंतर अनेक बँकांनी त्यांच्या एफडी व्याजदरातही सुधारणा केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक (State Bank of India, HDFC Bank, Axis Bank) आणि आयसीआयसीआय बँकेने अलीकडेच मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. मुदत ठेव हे गुंतवणुकीचे लोकप्रिय माध्यम आहे. हमी परताव्यामुळे आणि पैसे बुडण्याचा धोका नसल्यामुळे, मोठ्या संख्येने लोक बँक एफडी करतात. SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि Axis बँक यामध्ये तुलना करून बघूया कोणत्या बँकचे FD व्याजदर जास्त आहेत.
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
HDFC बँकेने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी FD व्याजदरात 75 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. 7 दिवस ते 10 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या FD वर, बँक आता सर्वसामान्य ग्राहकांना 3.00% ते 6.00% आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 6.75% व्याज देईल. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन दर 11 ऑक्टोबरपासूनच लागू झाले आहेत.
ॲक्सिस बँक (Axis Bank)
ॲक्सिस बँकेनेही एफडीचे व्याजदर वाढवले आहेत. वाढीव व्याजदर 14 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. Axis Bank आता 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर सर्वसाधारण लोकांना 3.50% ते 6.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 6.85% व्याजदर देत आहे.
एसबीआय बँक (SBI bank)
देशातील सर्वात मोठ्या बँकेने FD व्याजदरात 20 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. SBI आता सामान्य ग्राहकांना 3.00% ते 5.85% व्याज आणि 3.50% ते 6.65% ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर देत आहे. नवीन दर 15 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.
आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
ICICI बँकेने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. बँक आता 7 दिवस ते 10 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या बँक एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 3% ते 6.20% व्याज देईल. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 6.75% पर्यंत व्याज देत आहे. नवीन दर 18 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.
युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India)
युनियन बँक ऑफ इंडियानेही एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन व्याजदर 17 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. आता बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 3% ते 7% व्याज देईल. सर्वाधिक व्याजदर देणारी ही बँक आहे.