Most popular brand: दैनंदिन जीवन जगत असतांना आपल्या काही गरजा अशा असतात ज्या आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात. त्यामध्ये विविध नाव, ब्रॅंडच्या वस्तु आपण वापरतो. उदा. पारलेजी (Parle G)बिस्किट हे आपल्या आजी आजोबांपासून आपल्यापर्यंत आलेले आहे. आजी आजोबा आजही आपल्याला दुकानात घेऊन जाईल तर ते पारलेजीच बिस्किट आपल्याला घेऊन देईल, कारण त्यांचा त्या ब्रॅंडवर विश्वास आहे. काही असेही ब्रॅंड आहेट जे लोकांच्या मनावर इतके कोरले गेले की, वस्तूंचे नाव म्हणून ब्रॅंडचे नाव घेतले जाते. तर जाणून घेऊया अशा काही ब्रॅंडबद्दल.
Table of contents [Show]
प्रसिद्ध असलेले ब्रॅंड (Famous brand)
- वॅसलिन (Vaseline)
- कोलगेट (Colgate)
- बिस्लरी (Bisleri)
- निरमा (Nirma)
वॅसलिन (Vaseline)
वॅसलिन हा एक ब्रॅंड आहे. (Vaseline is a brand.)या ब्रॅंडचे बॉडी लोशन, लिप बाम, पोमेट यासारखे अनेक प्रॉडक्ट मिळतात. पण हिवाळा आला की आपण म्हणतो वॅसलिन आणायच आहे, दुकानात जाऊन पण वॅसलिनच (Vaseline) मागतो, त्या ऐवजी ब्रॅंड दूसरा घेऊ पण मागणार आपण वॅसलिनच. म्हणजे हा ब्रॅंड लोकांच्या इतका तोंडात बसलेला आहे की, ब्रॅंड कोणताही घेऊ पण मागणार आपण वॅसलिनच.
कोलगेट (Colgate)
सकाळी उठल्या बरोबर सगळ्यात आधी वापरात येणारी वस्तु म्हणजे पेस्ट. कोलगेट हा टुथपेस्टचा ब्रॅंड आहे. आपण पतंजलि, हिमालया (Patanjali, Himalayas) आणखी वेगवेगळे पेस्ट वापरतो पण दुकानात गेल्या नंतर कोलगेटच मागणार. हा सुद्धा ब्रॅंड लोकांनी बराच लक्षात ठेवला आहे.
बिस्लेरी (Bisleri)
प्रवासात असतांना तहान लागल्यानंतर सर्वात आधी आठवणारा शब्द म्हणजे (Bisleri) बिस्लेरी. पाणी कोणतेही असो मागणार आपण बिस्लरीच. हे असे काही निवडक ब्रॅंड आहेत जे आपल्या तोंडात बसलेले आहेत आणि आपण तेच उच्चारतो. घेतांना ब्रॅंड कोणताही घेऊ पण आपल्याला मागताना तेच नाव ओठावर येते.
निरमा (Nirma)
कपडे धुण्यासाठी वापरला जाणारा सोडा म्हणजे निरमा. निरमा (Nirma) हा एक ब्रॅंड आहे, ज्याची जाहिरात अनेकदा आपण बघतो. अजूनही महिला दुकानात निरमा हवा होता, असाच बोलतात. निरमाची छाप लोकांवर अजूनही अशी पडली आहे की, कोणीच ते विसरू शकले नाही आणि कदाचित विसरणार सुद्धा नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येते की जय गोष्टी आपल्या आजूबाजूला आपण नेहमी नेहमी अनुभवतो, ऐकतो, बघतो त्या आपल्या मनात आणि डोक्यात नेहमीसाठी राहतात, अगदी सोशल मीडियामधील फिल्टर बबल आणि इको चेंबर्स या संकल्पनेप्रमाणे.