Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What are filter bubbles and echo chambers?: फिल्टर बबल आणि एको चेंबर्स म्हणजे काय?

What are filter bubbles and echo chambers?: फिल्टर बबल आणि एको चेंबर्स म्हणजे काय?

Filter bubbles and echo chambers: कधी बारकाईने लक्ष देवून विचार करा की, जिथे सर्च इंजिन आणि ब्राउझर तुमच्या आवडी आणि नापसंती ठरवू लागतात आणि ते तुमचे इंटरनेट सर्च, मागील सर्च हिस्ट्री, परचेस हिस्ट्री यावर आधारित अल्गोरिदमच्या मदतीने ते पुन्हा पुन्हा तेच आपल्या समोर आणतात, त्या प्रक्रियेला काय म्हणतात? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Filter bubbles and echo chambers: फिल्टर बबल आणि एको चेंबर्स या दोन्ही संकल्पना सोशल मीडियाशी संबंधित आहे. आपण सोशल मीडिया वापरतो पण कधी त्याबाबत विचार केला का? आपण इतक्या आनंदाने जे प्लॅटफॉर्म वापरतो तेच आपल्याला त्यात गुंतवून आपली बौद्धिक क्षमता मर्यादित ठेवण्यास कारणीभूत ठरू शकतात. सोशल मीडियाबाबत जागरूक होणे सद्यस्थितीमध्ये फार महत्वाचे आहे. फिल्टर बबल आणि एको चेंबर्स हे दोन फॅक्टर तुम्हाला सोशल मीडियामध्ये गुंतवू ठेवू शकतात. त्यावर मिळालेली माहिती हीच तुमच्यासाठी अंतिम सत्य अशी सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुम्ही सुद्धा यात गुंतले आहात हे जाणून घेण्यासाठी एको चेंबर्स आणि अल्गोरिदमच्या म्हणजे काय? हे जाणून घ्या.  

एको चेंबर्स आणि अल्गोरिदमच्या म्हणजे काय? What are Echo Chambers and Algorithms?

आपल्या समोर जे येत ते आपण बघतो ज्यामुळे आपल्याला इको चेंबरमध्ये राहण्याची  सवय लागते. त्या व्यतिरिक्त कमीत कमी माहिती आपल्या पर्यंत पोहचते.  आपण जे ऐकलं, बघितलं  तेच पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्या समोर येत, त्याला सोशल मीडिया अभ्यासक (Social Media Practitioner)‘एको चेंबर्स’ असे म्हणतात. एको म्हणजे प्रतिध्वनि जी तुमच्या कानावर सतत पडत राहतो. हे सर्व घडून येत ते अल्गोरिदममुळे, तर आता अल्गोरिदम म्हणजे काय? तुम्हाला काल काय हवं होत? आज काय हवं आहे? उद्या काय पाहिजे? यावर प्रभाव टाकणारी टेक्नॉलॉजी (Technology). हे तुमच्या सर्च हिस्ट्रीप्रमाणे लिस्ट तयार करते. जाहिरात असो की दुसऱ्याच्या पोस्ट त्या आपल्यापर्यंत पोहचतात त्या फक्त अल्गोरिदमच्या माध्यमातून. 

अल्गोरिदमच्या हे चार गोष्टींवर अवलंबून असते, 

  • इन्व्हेंटरी Inventory
  • सिग्नल signal
  • प्रेडिक्शन Predictions
  • फायनल स्कोर Final score

Echo chambers and filter bubbles (1)

फिल्टर बबल म्हणजे काय? What is a filter bubble?

फिल्टर बबल ही संकल्पना  2010 मध्ये इंटरनेट कार्यकर्ते एली पॅरिसर यांनी सांगितली होती आणि त्यांचा असा विश्वास आहे की इंटरनेट हळूहळू इको चेंबरमध्ये बदलत आहे. ते म्हणाले की   फिल्टर बबल लोकांना हेराफेरी आणि प्रचाराचे बळी बनवू शकतात. फिल्टर बबल हे conformation आणि एको चेंबर्सला प्रोत्साहन देतात. आपण जे ऐकतो वाचतो बघतो त्याचा आपल्या भोवती एक फुगा तयार होतो, त्याला फिल्टर बबल असे म्हणतात. म्हणजेच आपली बौद्धिक पातळी यामुळे वाढत नाही तर तितकीच मर्यादित राहते. शेवटचे म्हणजे जे माहिती आपल्याला यावरून माहित झाली तीच आपल्यासाठी अंतिम सत्य असते. खरं खोट यातील फरक समजणे सुद्धा कठीण जाते. उदा. मी एक मीडिया एज्युकेटर आहे आणि जर मी सोशल मीडियावर मीडिया एज्युकेटर्सचे ग्रुप  शोधले किंवा त्यात सामील झाले तर पुढच्या वेळी ती वेबसाइट मला अधिक मीडिया एज्युकेटरचे  ग्रुप ऑप्शन मध्ये दाखवतील. 

फिल्टर बबल आणि एको चेंबर्स मधून बाहेर पडायचे असेल तर….. 

  • तुमची सर्च हिस्ट्री डिलीट करा. 
  • वारंवार येत असलेल्या पोस्ट न बघता नवीन काही शोधा. 
  • मिळालेल्या माहितीमध्ये समाधानी न राहता नवीन माहिती शोधा. 
  • नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी उत्सुकता निर्माण करा. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना फिल्टर बबल आणि एको चेंबर्सचा काय फायदा? 

फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन हे सर्व प्लॅटफॉर्म सध्या अनेकांचे इन्कम सोर्स बनलेले आहे. त्यांना मिळालेल्या इन्कममध्ये या प्लॅटफॉर्मचा सुद्धा वाटा असतो. फॉलोअर्स,  लाईक कमेंट्स या सर्व बाबींचे टार्गेट पूर्ण केल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना इन्कम सुरू होते. यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जाहिराती. जाहिरातींच्या माध्यमातून सर्वात जास्त इन्कम यांना मिळत असतं. म्हणून फिल्टर बबल आणि एको चेंबर्स निर्माण करून त्याच जाहिराती, पोस्ट तुमच्या समोर आणल्या जातात.