Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI NOW PAY LATER: बँकेत पैसे नसतानाही करता येणार पेमेंट, कसं ते जाणून घ्या

UPI NOW PAY LATER

UPI NOW PAY LATER: डिजिटल बँकिंग, युपीआय, गुगल पे, नेट बँकिंग, फोन बँकिंग या सर्व डिजिटल सुविधांमुळे रोख रकमेचे व्यवहार हळुहळू कमी होऊ लागले आहेत. कारण डिजिटली पेमेंट लवकर होते आणि त्यासाठी पैसे सोबत ठेवावे लागत नाही. पण आता UPI Now, Pay Later या सुविधेमुळे बँकेत पैसे नसतानाही पेमेंट करता येणार आहे.

UPI NOW PAY LATER: पे लेटर सुविधा वापरणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. विविध ई-कॉमर्स कंपन्या ज्याप्रमाणे Buy Now Pay Later ची सुविधा देतात. अगदी तशीच सुविधा आता UPI (Unified Payments Interface) देणार आहे. म्हणजे बँकेत पुरेसे पैसे नसतानाही ग्राहकांना युपीआयच्या मदतीने पेमेंट करता येणार आहे.

पूर्वी क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची एक वेगळीच ऐट असायची. कारण त्यांना कार्ड स्वॅप करून कधीही, कुठेही आणि कोणतीही खरेदी करता येत होती. पण डिजिटायझेशनमुळे याचे आकर्षण बऱ्यापैकी कमी झाले आहे. पण अजूनही क्रेडिट कार्डधारकांना क्रेडिटची सवलत मिळत आहे. अगदी तशीच सवलत आता युपीआय वापरणाऱ्यांनाही मिळणार आहे. युपीआयने आपल्या ग्राहकांसाठी UPI Now, Pay Later ही सुविधा आणली आहे.

आरबीआयने काही दिवसांपूर्वी युपीआयद्वारे बँकांमध्ये प्री-सॅन्क्शन क्रेडिट लाईनद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे काही बँकांनी या सुविधेचे UPI Now, Pay Later असे नामकरण करून टाकले आहे. खाजगी बँकांमधील HDFC आणि ICICI बँकेने यापूर्वीच अनुक्रमे HDFC UPI Now Pay Later आणि ICICI PayLater ही सेवा सुरू केली आहे. सध्या एचडीएफसी बँक 50 हजारापर्यंत युपीआय नाऊ, पे लेटर ही सुविधा देत आहे.

बँकेत पैसे नसले तरी पेमेंट होणार

डिजिटल बँकिंग, युपीआय, गुगल पे, नेट बँकिंग, फोन बँकिंग या सर्व डिजिटल सुविधांमुळे रोख रकमेचे व्यवहार हळुहळू कमी होऊ लागले आहेत. कारण डिजिटली पेमेंट लवकर होते आणि त्यासाठी पैसे सोबत ठेवावे लागत नाही. पण आता UPI Now, Pay Later या सुविधेमुळे बँकेत पैसे नसतानाही पेमेंट करता येणार आहे. आरबीआयने युपीआयला ही सेवा वापरण्यास परवानगी दिली असून काही खाजगी बँका ही सेवा वापरत आहेत.

मार्केटमध्ये सध्या पे लेटर जोडून अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जात आहेत. यामध्ये Amazon Pay Later, Flipkart Pay Later, Buy Now Pay Later, Travel Now Pay Later तसेच Wedding Now Pay Later अशी सुविधा सुद्धा दिली जात आहे. 

UPI Now, Pay Later कसं वापरायचं

ही सुविधा कोणाला द्यायची आणि त्याचे लिमिट किती असणार हे ठरवण्याचा अधिकार बँकांना आहे. बँका ग्राहकांच्या पात्रतेनुसार या सुविधेचा वापर करण्यास परवानगी देणार आहे. ज्या ग्राहकांना बँकांनी या सुविधेसाठी मान्यता दिली आहे. त्या ग्राहकांना या सुविधेचा वापर केल्यानंतर खर्च केलेली रक्कम दिलेल्या मुदतीत भरणे गरजेचे आहे. काही बँका यासाठी व्याज आकारू शकतात. याबाबत प्रत्येक बँकेचे नियम वेगवेगळे असू शकतात.

युपीआय नाऊ, पे लेटर ही सुविधा सुरू करण्यासाठी ग्राहकांकडून 199 रुपये आणि त्यावर जीएसटी अशी वनटाईम फी आकारली जाते. युपीआयच्या पे लेटर अकाउंटमध्ये ग्राहक नेट किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करू शकतात.