Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Pay Later: ॲमेझॉन पे लेटर काय आहे? त्याचे फायदे, पात्रता आणि चार्जेस जाणून घ्या!

What is Amazon Pay Later

Image Source : www.amazon.in

Amazon Pay Later: ॲमेझॉन पे लेटर या फीचर्सचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट दिले जात आहेत. त्याचे इतर फायदे आणि चार्जेस जाणून घ्या.

Amazon Pay Later: ॲमेझॉन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने फक्त ऑनलाईन शॉपिंगच नाही तर एकूण शॉपिंगची व्याख्याच बदलून टाकली आहे. सध्या अशी कोणतीही गोष्ट नाही की, ती तुम्ही ॲमेझॉनवरून मागवू शकता. ॲमेझॉनने वेगवेगळ्या प्रॉडक्टसह आपल्या वेबसाईटवरही नवनवीन फीचर्सचा अनुभव ग्राहकांना देत आहे.

ॲमेझॉनने नुकतेच सुरू केलेल्या Amazon Pay Later या फीचर्समुळे खरेदीदारांना वस्तू लगेच खरेदी करता येते आणि त्याचे पेमेंट टप्प्याटप्प्याने करता येते. तर आज आपण Amazon Pay Later या नवीन फीचर्सची संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यासाठी पात्रता काय आहे आणि या सुविधेचा वापर करण्यासाठी काही चार्जेस आकारले जातात का?

What is Amazon Pay Later?

ॲमेझॉन पे लेटर ही पूर्णत: ॲमेझॉनची एक सुविधा आहे; जी ग्राहकांसाठी आणण्यात आली आहे. ज्याचा वापर तुम्ही ॲमेझॉनच्या वेबसाईटवरच करू शकता. Pay Later या फीचरबद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल. पे लेटर म्हणजे पैसे नंतर द्या. म्हणजे ॲमेझॉन पे लेटर म्हणजे, तुम्ही वस्तू लगेच खरेदी करा आणि त्याचे पैसे ईएमआयने भरा. एका ठराविक कालावधीत प्रत्येक महिन्याला पैसे भरण्याची सुविधा ॲमेझॉन पे लेटरमध्ये आहे.

साध्या-सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ॲमेझॉन वेबसाईट आपल्या ग्राहकांना Amazon Pay Laterच्या माध्यमातून क्रेडिट कार्डची सुविधा देत आहे. क्रेडिट कार्डने ज्याप्रमाणे स्वाईप केल्यानंतर त्याचे पैसे भरण्याचा किमान कालावधी मिळतो. त्याचप्रमाणे Amazon Pay Later द्वारे ग्राहकांना वस्तू खरेदी केल्यानंतर एका ठराविक कालावधीपर्यंत पैसे भरण्याची मुदत मिळते. फक्त या सुविधेमध्ये फरक इतकाच की, क्रेडिट कार्डने कुठेही पेमेंट करता येते. पण ॲमेझॉन पे चा वापर फक्त Amazon Platform वर करता येतो.

ॲमेझॉन पे लेटर फीचर हे थोड्याफार प्रमाणात क्रेडिट कार्ड प्रमाणेच काम करते. यामध्ये पर्सनल क्रेडिटला खूप महत्त्व आहे. इथे तुमचा रेकॉर्ड चांगला असेल तर तुम्हाला क्रेडिट लिमिट जास्त मिळते.

क्रेडिट कार्डची गरज नाही

ॲमेझॉनवर खरेदी करताना Amazon Pay Laterचा वापर केल्यास क्रेडिट कार्डची गरज भासत नाही. तुम्ही फक्त पत्त्याचा पुरावा देऊन, मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड आणि बँक खाते जोडून ॲमेझॉन पे लेटरचे खाते ओपन करू शकता. या खात्यावरून तुम्ही डेबिट/क्रेडिट किंवा कॅश ऑन डिलेव्हरी हा पर्याय न वापरता मनमुराद खरेदी करू शकता.

फी भरावी लागत नाही

Amazon Pay Later फीचरचा वापर करण्यासाठी कोणतीही फी भरावी लागत नाही. ही सुविधा पूर्णत: मोफत आहे. तसेच यासाठी कोणती प्रोसेसिंग फी, ट्रान्सॅक्शन फी किंवा ही सुविधा रद्द करण्यासाठीही कोणतीच फी भरावी लागत नाही.

ॲमेझॉन पे लेटरवर डिस्काउंट मिळतो का?

ॲमेझॉनवर नव्याने लॉगिन करणाऱ्या ग्राहकाला त्याच्या पहिल्या Amazon Pay Later खरेदीवर 150 रुपये बोनस मिशतो. तर 1 हजार रुपयांच्या खरेदीवर 100 रुपये कॅशबॅक मिळतात. याचबरोबर डीटीएच रिचार्ज, इलेक्ट्रिसीटी बिल यावरही डिस्काउंट मिळतो.