Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flipkart Pay Laterचा वापर करा आणि पुढील महिन्यात झिरो इंटरेस्टने बिल पे करा

Flipkart Pay Later

Image Source : www.flipkart.com

Flipkart Pay Later: फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना विविध वस्तुंवर सवलती तर देत आहेच. पण त्याचबरोबर आता फ्लिपकार्टने 'शॉप नाऊ पे लेटर'च्या धर्तीवर फ्लिपकार्ट पे लेटरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Flipkart Pay Later: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी केल्या जाणाऱ्या विविध वस्तुंवर भरमसाठ सवलती देण्याबरोबरच फ्लिपकार्टने आता आपल्या ग्राहकांसाठी शॉप नाऊ, पे लेटर (Shop Now Pay Later) विथ फ्लिपकार्ट पे लेटर ही स्कीम आणली आहे. म्हणजे ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तुंवर मिळणाऱ्या सवलतीबरोबरच आता खरेदी केलेल्या वस्तुचे पैसे टप्प्याटप्प्याने भरण्याची सुविधा फ्लिपकार्टने उपलब्ध करून दिली आहे.

फ्लिपकार्टने सध्या आपल्या ग्राहकांना साईटवरून विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी बाय नाऊ पे लेटर (Buy Now Pay Later)ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ग्राहकांना वस्तू खरेदी करताना किंवा प्रत्यक्ष खरेदी करताना त्या वस्तुचे लगेच पैसे देण्याची घाई करावी लागत नाही. तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करताना ओटीपीची वाट पाहावी लागणार नाही. फ्लिपकार्टने आणलेल्या Flipkart Pay Later या सुविधेचा वापर करून ग्राहक कोणत्याही अडथळ्याशिवाय खरेदीचा आनंद घेऊ शकतात.

फ्लिपकार्ट पे लेटरची वैशिष्ट्ये

  • 1 लाखापर्यंत इन्स्टंट क्रेडिट
  • पैसे पुढील महिन्यात किंवा ईएमआयने भरण्याची सुविधा
  • प्रक्रियेसाठी फक्त 30 सेकंदाचा कालावधी
  • एका क्लिकवर प्रक्रिया पूर्ण होते
  • इलेक्ट्रिसिटी, गॅस, पोस्टपेड आणि इतर बिले भरण्याची सुविधा
  • झिरो पेमेंट किंवा किमान पेमेंट भरून खरेदी करण्याची सुविधा
  • फ्लिपकार्ट पे लेटर स्कीम Myntra वरही वापरता येते
  • फ्लिपकार्ट पे लेटर अंतर्गत बिल पुढील महिन्याच्या 5 तारखेला भरता येते


How to avail Flipkart Pay Letter facility_

फ्लिपकार्टची बाय नाऊ पे लेटर स्कीम काय आहे?

फ्लिपकार्टची पे लेटर ही स्कीम, बाय नाऊ पे लेटर याप्रमाणेच काम करते. या स्कीमच्या मदतीने ग्राहक फ्लिपकार्टवरून कोणतेही प्रोडक्ट लगेच खरेदी करू शकतात आणि त्याचे पैसे नंतर देऊ शकतात. या स्कीममधील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहक संबंधित वस्तुचे पैसे ने देता ती वस्तू ऑर्डर करू शकतो. त्याचे पैसे नंतर एकदम किंवा ईएमआयद्वारे टप्प्याटप्प्याने देऊ शकतो. ही सुविधा काही ठराविक उत्पादनांवर उपलब्ध असू शकते.

फ्लिपकार्ट पे लेटर स्कीमवर इंटरेस्ट लावला जातो का?

होय, फ्लिपकार्ट पे लेटर या स्कीमवर इंटरेस्ट लावला जात नाही. ही इंटरेस्ट फ्री पर्याय असलेली स्कीम आहे. या स्कीम अंतर्गत ग्राहक एखाद्या वस्तुची तात्काळ खरेदी करून त्याचे पैसे नंतर देऊ शकतो. यासाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकाला कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही.

फ्लिपकार्ट पे लेटर स्कीमचे पैसे भरले नाही तर काय होते?

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या ऑनलाईन साईट्स जसे की, पोस्टपेड, ओला मनी पोस्टपेड, अॅमेझॉन पे लेटर आणि फ्लिपकार्ट पे लेटरची सुविधा देणाऱ्या कंपन्या, दिलेल्या मुदतीत पैसे भरले नाही तर त्या संबधित ग्राहकाकडून 600 रुपयांपर्यंत चार्ज वसूल करतात. फ्लिपकार्ट पे लेटरमध्ये 100 ते 5,000 रुपयांपर्यंतच्या वस्तुवर 60 ते 600 रुपयांपर्यंत लेट फी चार्ज करते.

फ्लिपकार्ट पे लेटर स्कीमद्वारे ग्राहकांना किती रुपयांपर्यंत लिमिट मिळते?

फ्लिपकार्ट पे लेटर स्कीमद्वारे ग्राहकांना 1 लाखापर्यंत प्री-अॅप्रव्ह्यू क्रेडिट लिमिट मिळते. याशिवाय यावर ग्राहकांना विविध प्रीमिअम प्रोडक्ट्सवर सवलतही मिळते.

फ्लिपकार्ट पे लेटर सुविधेची पार्टनर बॅंक कोणती आहे?

फ्लिपकार्ट पे लेटर सुविधेची पार्टनर बॅंक आयडीएफसी बॅंक (IDFC Bank) आहे. या बॅंकेदवारे फ्लिपकार्ट पे लेटर सुविधेची पूर्तता केली जाते.