Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Travel Now Pay Later: आधी प्रवास करा, नंतर पैसे द्या; ट्रॅव्हलर्ससाठी भन्नाट ऑफर!

Travel Now Pay Later: आधी प्रवास करा, नंतर पैसे द्या; ट्रॅव्हलर्ससाठी भन्नाट ऑफर!

Travel Now Pay Later: कोरोनानंतर लोकांवर आलेल्या आर्थिक ताणामुळे अनेक ट्रॅव्हल कंपन्यांनी 'आता प्रवास करा, नंतर पैसे द्या' (Travel Now Pay Later-TNPL) अशा ऑफर सुरू केल्या आहेत. ट्रॅव्हल कंपनींच्या या ऑफरला लोकांकडून चांगलीच मागणी असल्याचे दिसून येत आहे.

कर्ज काढून परदेशात फिरायला जाण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. कोरोनाच्या काळात टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला होता. त्या काळात लोकांकडे पुरेसा पैसा नव्हता. त्यामुळे ट्रॅव्हल कंपन्यांनी लोकांना कर्ज देऊन त्यांची फिरण्याची हौस पूर्ण करण्यावर भर दला. त्यांची ही युक्ती सर्वसामान्यांना इतकी आवडली की, आता काही नवविवाहित जोडपी कर्ज काढून ईएमआयच्या भरवशावर हनिमून पॅकेजचा आनंद घेत आहेत.

कोरोना संसर्गानंतर सर्व निर्बंध उठल्यानंतर जगातील बहुतेक देश पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधात अडकलेले भारतीय परदेशातील टूरिस्ट प्लेसवर गर्दी करत आहेत. या दोन वर्षांत ट्रॅव्हल कंपन्यांची कमी झालेली मागणी आणि लोकांवरील आलेल्या आर्थिक ताणामुळे अनेक जण आपली फिरण्याची हौस पूर्ण करण्यासाठी ईएमआयवर पर्यटन करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. यामुळे ट्रॅव्हल कंपन्यांच्या 'आता प्रवास करा, नंतर पैसे द्या' (Travel Now Pay Later-TNPL) ऑफरच्या मागणीत वाढ होत आहे. यामध्ये खासकरून व्यावसायिक, आयटी फिल्डमधील पगारदार आणि विशेषतः हनीमूनसाठी जाणाऱ्या नवदाम्पत्यांचा समावेश आहे.

पूर्वी फिरण्यासाठी किंवा पर्यटनासाठी लोन काढणाऱ्यांची संख्या फक्त 1 ते 2 टक्के इतकी होती. पण त्यामध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत असून टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल कंपन्यांकडे लोन काढून किंवा ईएमआय काढून पर्यटन करणाऱ्यांचा आकडा 40 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. थॉमस कुक या ट्रॅव्हल कंपनीच्या ग्राहकांमध्ये ईएमआय काढून फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली. यासाठी ट्रॅव्हल कंपन्यांनी फिनटेक कंपन्यांसोबत भागीदारी करत ‘प्रवास आता करा आणि पैसे नंतर द्या’ अशा योजनांवर भर देण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर ट्रॅव्हल कंपन्यांनी अनेक बॅंकांसोबत भागीदारी करून क्रेडिट फॅसिलिटी उपलब्ध करून दिली. यामुळे ग्राहकांना 3 महिन्यांपासून 13 महिन्यांपर्यंत इन्स्टॉलमेंट भरण्याची सोय उपलब्ध करून दिली.

देशाबाहेर फिरण्यासाठी गेल्यास सरासरी 1.5 लाख रूपये खर्च येतो, अशी माहिती थॉमस कूकची उपकंपनी असलेली हॉलिडेज एसओटीसी ट्रॅव्हल कंपनीचे अध्यक्ष डॅनिअल डिसूझा यांनी दिली. सध्या काही लोकल ट्रॅव्हल कंपन्याही बॅंकांशी टायअप करून नवविवाहित जोडप्यांना हनिमूनसाठी कर्ज उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे ‘आता प्रवास करा, पैसे नंतर द्या’ याचे प्रमाण वाढत चालले आहे. कर्ज घेऊन विदेशात फिरायला जाणाऱ्यांची संख्या यावर्षी 25 ते 40 टक्क्यांनी वाढली.

Travel Now, Pay laterचा लाभ कोणाला घेता येईल?

ज्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत; ते कधीही आणि कुठेही फिरण्यासाठी जाऊ शकतात. पण ज्यांच्याकडे फिरण्यासाठी अतिरिक्त किंवा वेगळे पैसे नाहीत. अशा लोकांसाठी ट्रॅव्हल नाऊ, पे लेटर सारखी सुविधा फायद्याची ठरू शकते. कोणताही भारतीय व्यक्ती या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी संबंधित व्यक्तीच्या हातात किमान 25 हजार रुपये पगार येणे गरजेचे आहे किंवा एखाद्या व्यावसायिकाचे वार्षिक उत्पन्न 5 लाखापर्यंत असणे गरजेचे आहे.

अ‍ॅप्लाय कसे करायचे?

बियॉण्डर डॉट ट्रॅव्हल (beyonder.travel) या ट्रॅव्हल कंपनीच्या वेबसाईटवरून तुम्ही तुमची आर्थिक पात्रता तपासू शकता. इथे अ‍ॅप्लाय नाऊवर क्लिक करून तुम्हाला फिरण्यासाठी किती रुपयांची गरज आहे. तुमचे पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक, पत्ता, शहर तसेच नोकरीचे स्वरुप आणि तुम्हाला किती ईएमआय परवडू शकतो आदी माहिती देऊन कंपनी तुम्हाल काय ऑफर देऊ शकते. हे तपासू शकता.

अशाचप्रकारे तुम्ही एचडीएफसीच्या फ्लेक्सी पे द्वारे मेक माय ट्रीप (MakeMyTrip) वरून ट्रॅव्हल नाऊ पे लेटरचा लाभ घेऊ शकता. मेकमाय ट्रीपच्या साईटवर किंवा अ‍ॅपवरून ट्रीप अरेंज केल्यानंतर पैसे भरण्यासाठी पे लोटर व्हाया फ्लेक्सीपे या पर्यायाचा वापर करू शकता. इथे तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी व्हेरिफाय करून या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. इथे मेकमाय ट्रीप तुम्हाला 300 रुपयांचे अतिरिक्त व्हाऊचर सुद्धा देते. ट्रॅव्हल कंपनी संकष यांच्याद्वारेही ट्रॅ्व्हलिंगसाठी लगेच पैसे न भरता टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ज्याद्वारे तुम्ही तुमची सुट्टी तुमच्या सोयीप्रमाणे एन्जॉय करू शकता.