Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या, पगारावरील टॅक्स कसा कॅलक्युलेट करायचा?

TAX CALCULATION

ITR Return Filing : इन्कम टॅक्स हा एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर सरकारद्वारे आकारला जाणार टॅक्स आहे. हा टॅक्स सर्वसामान्य व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), कंपनी, सहकारी संस्था आणि ट्रस्ट यांना लागू होतो. पण हा टॅक्स त्या व्यक्तीचे उत्पन्न आणि त्याच्या वयाच्या आधारावर ठरतो.

इन्कम टॅक्स (Income Tax) हा एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर सरकारद्वारे आकारला जाणारा टॅक्स आहे. हा टॅक्स सर्वसामान्य व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), कंपनी, सहकारी संस्था आणि ट्रस्ट यांना लागू होतो. पण हा टॅक्स त्या व्यक्तीचे उत्पन्न आणि त्याच्या वयाच्या आधारावर ठरतो. त्यामुळे टॅक्स रिटर्न फाईल (ITR Filing) करण्यापूर्वी तुमच्या उत्पन्नावर किती टॅक्स लागू शकतो, हे पडताळून पाहू शकता.

करपात्र उत्पन्न म्हणजे एखाद्या पगारदार व्यक्तीला जे उत्पन्न मिळते. त्यातून कर सवलत, वजावट आणि सवलत वजा करून जे उत्पन्न उरतं त्याला करपात्र उत्पन्न म्हणतात पण काही जणांना ही टॅक्सची आकडेमोड कळत नाही. त्यांना टॅक्स कॅलक्युलेट करण्याची प्रक्रिया थोडीफार किचकट वाटू शकते. पण ती जर समजून घेतली नाही आणि त्यानुसार उपाययोजना केल्या नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून आज आपण अगदी साध्या-सोप्या पद्धतीने टॅक्स कसा लागू होतो किंवा एखाद्याला मिळालेल्या पगारावर टॅक्स कसा लागतो. हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.


तुमच्या पगारावरील इन्कम टॅक्स मोजण्यासाठी चार्टर्ड अकाउंटटकडे जाण्याची गरज नाही. इन्कम टॅक्स विभागाने करदात्यांना टॅक्स मोजण्यासाठी ऑनलाईन इन्कम टॅक्स कॅलक्युलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या कॅलक्युलेटरच्या मदतीने तुमच्या वार्षिक उत्पन्नावर किती टॅक्स भरावा लागेल, हे समजून घेण्यास तुम्हाला मदत होईल.

इन्कम टॅक्स कॅलक्युलेटर कसे वापरावे?

  • इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवरील होम पेजवर Tax Payer Services या टॅबवर क्लिक करा. या पेजवर सर्वात खाली तुम्हाला Tax Calculator दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर टॅक्स कॅलक्युलेटर ओपन झाले आहे. तुमचा टॅक्स कॅलक्युलेट करण्यासाठी सर्वप्रथम असेसमेंट वर्ष निवडा.
  • त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचे Tax payer आहात; जसे की, वैयक्तिक, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), फर्म, एलएलपी (LLP), सहकारी संस्था, देशांतर्गत कंपनी, विदेशी कंपनी या पर्यायांपैकी एक पर्याय निवडा.
  • जर तुम्ही 115BAC अंतर्गत टॅक्स हा पर्याय निवडत असाल तर तुम्हाला Yes हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचा टॅक्स नवीन टॅक्स प्रणालीद्वारे मोजला जाईल.
  • त्यानंतर तुम्हाला Gender  या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे. 
  • आता तुमचे निवासी आणि अनिवासी (Resident or Non-Resident) यातून एका वास्तव्याचे ठिकाण निवडा. 
  • आता तुम्हाला पगारातून मिळणारे एकूम उत्पन्न येथे टाका.
  • त्यानंतर इतर स्त्रोतांमधून जसे की, घराच्या भाड्यातून मिळणारे उत्पन्न, भांडवली नफा, व्यवसाय, शेतीतून मिळणारे उत्पन्न टाका.
  • आता ज्या कपातीचा तुम्हाला दावा करायचा आहे, तो इथे टाकावा लागेल.
  • इथे तुम्हाला एकूण कर दायित्व, रिटर्न सबमिट करण्याची देय तारीख, रिलिफ अदर दॅन रिलिफ 87A, TDS/TCS/MAT (AMT) 
  • आणि सर्वांत शेवटी डिटेल ऑफ टॅक्स पेड


ही प्रक्रिया झाल्यानंतर आता कॅलक्युलेट या बटणावर क्लिक करा. तुम्हाला लागू असलेला टॅक्स दिसेल. पण जर तुम्हाला नवीन टॅक्स स्लॅब अंतर्गत तुमचे इन्कम टॅक्स दायित्व (Income Tax Liability) जाणून घ्यायची असल्यास कोणत्याही सवलतींचा लाभ न घेता तुम्हाला मिळणारा पगार टाकण्याचा पर्याय देखील इथे उपलब्ध आहे. अशाप्रकारे तुम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवरील कॅलक्युलेटरचा वापर करू शकता.