Union Budget 2023 For Sports: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रीडा क्षेत्रासाठी किती निधीची तरतूद केली आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात किती निधी देण्यात आला आहे. याबाबत जाणून घेवुयात.
क्रीडा क्षेत्रासाठी किती निधी? (How much Funding For Sports Sector)
अर्थसंकल्पमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रीडा क्षेत्रासाठी सुमारे 3 हजार 397.32 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. हा वाढीव निधी खेळाडूंच्या विकासासाठी करण्यात आला आहे. कारण यावर्षी भारत एशियन गेम्समध्ये सहभाग घेणार आहे. तसेच 2024 च्या पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना तयारी देखील करायची आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्राला 723.97 कोटी रूपये वाढीव निधी मिळाला आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्राला 2,673.35 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला होता.
खेलो इंडियाला अधिक प्राधान्य (More Preference to Khelo India)
सरकार क्रीडा मंत्रालयाचा सर्वाधिक महत्वाचा उपक्रम असणाऱ्या खेलो इंडियाला अधिक प्राधान्य दिले असल्याचे दिसते. कारण या उपक्रमासाठी शासनाने 1,045 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. तर मागील वर्षी या उपक्रमासाठी 606 कोटी रूपयांची तरतूद केली होती. ही तुलना पाहता, आताच्या अर्थसंकल्पात तब्बल 439 कोटी रूपयांची वाढ केली आहे. या उपक्रमाचा फायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक आणि एशियन गेम्ससाठी होणार आहे. कारण यामुळे चांगले खेळाडू तयार करता येणार आहे. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात जम्मू-काश्मीरमधील क्रीडा सुविधा वाढ करण्यासाठी शासनाने 15 कोटींवरून थेट 50 कोटींपर्यंत वाढ केली आहे.