Goonj Urban Fellowship : गुंज फेलोशिपमधीलच एक भाग म्हणजे अर्बन फेलोशिप. गुंज अर्बन फेलोशिप ही गूंज ना-नफा संस्था द्वारे पदवीधर विद्यार्थ्यांना ऑफर केली जाते. हा 12-महिन्यांचा कार्यक्रम आहे ज्यात देशाच्या कोणत्याही भागात शहरी आणि ग्रामीण भागात फेलो काम करतात. निवडलेल्या उमेदवाराला दरमहा 20,000 रुपये मानधन दिले जाते. या फेलोशिपमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 असावे. त्याचबरोबर उमेदवाराचे पदवीचे शिक्षण झाले असावे. 2023-24 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मे होती. या फेलोशिपसाठी पुढील वर्षी अर्ज करायचा असल्यास गुंज फेलोशिपच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
या फेलोशिपसाठी निवड कशी केली जाते?
या फेलोशिपसाठी अर्ज केल्यानंतर पात्रता निकषांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाते. त्यासाठी उमेदवार पदवीचे शिक्षण घेतलेला आणि 21 ते 30 वयोगटातील असावा. त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाते, त्यात तुमचे सर्व स्किल चेक केले जातात. उदा. लीडरशिप, संभाषण कौशल्य, ग्रुप डिस्कशन इत्यादि. यासर्व बाबींवरून तुमची निवड केली जाते. त्याचबरोबर फॉर्म सबमिट करतांना काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा अचूक द्यावी लागतात. त्यांना ती उत्तरे पटली तरच तुम्ही मुलाखतीसाठी निवड होते. ही फेलोशिप पदवीधर तरुण तरुणींना दिली जाते, ते ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील.
तुम्ही अर्ज कसा करू शकता?
- गुंज फेलोशिपच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- त्यानंतर खालील 'आता अर्ज करा' बटणावर क्लिक करा.
- डॅशबोर्डच्या उजव्या बाजूला असलेल्या 'नोंदणी' बटणावर क्लिक करा
- 'नोंदणी' करण्यासाठी आवश्यक डिटेल्स भरा.
- आधीच नोंदणीकृत असल्यास, नोंदणीकृत ईमेल आयडी वापरून लॉग इन करा.
- 'फेलोशिपसाठी अर्ज करा' बटणावर नेव्हिगेट करा आणि त्यावर क्लिक करा.
- खाली असलेल्या 'अर्बन फेलोशिप' बटणावर नेव्हिगेट करा.
- अर्ज भरा आणि अर्ज पूर्ण करण्यासाठी पुढील क्लिक करा.
नियम आणि अटी
फेलोशिप मध्यभागी सोडल्यास फेलोला 15 दिवसांचा नोटिस कालावधी द्यावा लागेल. असे न केल्यास 15 दिवसांचे मानधन रद्द केल्या जाते. ही फेलोशिप पुढील अर्जांसाठी बंद आहे. हे मार्च, 2024पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षीसाठी अर्ज करायचा असल्यास त्याबाबत संपूर्ण माहिती गुंज फेलोशिपच्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल.