Apple Users for Update: Apple युजर्ससाठी एक महत्वपूर्ण अपडटे आली आहे. अॅपल कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, हवामान अंदाज सांगणारे लोकप्रिय अॅप वेदर अॅप डार्क स्काय (Weather app Dark Sky) हे बंद करण्यात आले आहे. याचे कारण काय आहे, हे जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
का केले बंद
2020 मध्ये Apple कंपनीने Weather app Dark Sky हे अॅप खरेदी केले होते. आता या कंपनीने हे अॅप स्टोअरमधून काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यावेळी अॅपलने आयफोन, मॅक आणि आयपॅडमध्ये आधीच हवामान अंदाज सांगणारे अॅप दिले होते. ज्यानंतर डार्क स्कायचे फीचर्स अॅपलसोबत इंटिग्रेट करण्यात आले होते. म्हणून हे अॅप जरी बंद असले, तरी Apple Weather अॅप पूर्वीप्रमाणेच काम करत राहणार आहे.
Apple Weather कसे काम करते
Apple Weather हे अॅप युजर्स ज्या लोकेशनवर असेल, तेथील भागाचे हवामान अंदाज सांगते. यासोबतच 1 तासानंतरच्या हवामानाची माहितीदेखील याव्दारे मिळते. एवढेच नाही, तर यामध्ये तुम्ही पुढील 10 दिवसांच्या हवामानाची माहिती देखील प्राप्त करू शकता.
iOS वर आणखी काय उपलब्ध
Apple Weather सध्या iOS 16, iPadOS 16 व macOS 13 Ventura वर पाहता येणार आहे. हे रअॅप फक्त नवीन युजर्स वापरू शकता. कंपनींने केलेल्या घोषणेनुसार, अॅपल 31 मार्चपासून आपल्या डार्क स्काय अॅपच्या थर्ड पार्टी वेदर अॅप्सचे API बंद करणार आहे. Dark Sky चे Android आणि Wear OS अॅप्सचा वापर जुलै 2020 मध्ये घेतल्यानंतर 2 महिन्यांनी संपुष्टात आला होते आणि आता ते App Store वरून देखील काढण्यात येत आहे.
Apple नवीन iPad Pro मॉडेल्सवर काम करत असल्याचे समजत आहे. रिपोर्टनुसार, कंपनी दोन नवीन OLED iPad Pro मॉडेल्स बनविण्याच्या तयारित आहे. हे माॅडेल्स 2024 च्या सुरुवातीला लॉन्च केले जाणार आहे. यासोबतच कंपनी नवीन मिनी आयपॅड देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे.