Quant Mutual Fund: गेल्या काही दिवसात जगभर सुरू असलेल्या जागतिक मंदीच्या बातमीमुळे आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे शेअर मार्केटमध्ये निराशाजनक वातावरण दिसून येत आहे. 1 फेब्रुवारीला केंद्राचे बजेट (Union Budget 2023) सादर झाले तेव्हा सेन्सेक्स 1200 अंकांनी वाढून दिवसअखेर तो लाल अंकातच बंद झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशावेळी गुंतवणूक तज्ज्ञांकडून शेअर मार्केटऐवजी म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. तर आज आपण क्वांट म्युच्युअल फंडमधील टॉप 5 फंड स्कीम्सची (Quant Mutual Fund) माहिती घेणार आहोत. त्या फंडने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे.
Table of contents [Show]
क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड (Quant Small Cap Mutual Fund)
क्वांट म्युच्युअल फंडमधील क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्कीमने गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांना 50.47 टक्के इतका परतावा मिळवून दिला आहे. या फंडमध्ये किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. गेल्या 3 वर्षात या फंडने किमान 18.80 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
क्वांट इन्फ्रस्ट्रक्चर म्युच्युअल फंड (Quant Infrastructure Fund)
क्वांट इन्फ्रस्ट्रक्चर म्युच्युअल फंडने गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 38.88 टक्के परतावा दिला आहे. या फंडमध्ये किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. गेल्या 3 वर्षात या फंडने किमान 14.66 टक्के तर कमाल 38.88 टक्के परतावा दिला आहे.
क्वांट टॅक्स प्लॅन फंड (Quant Tax Plan Fund)
क्वांट टॅक्स प्लॅन फंडने गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 37.38 टक्के परतावा दिला आहे. या फंडमध्ये किमान 500 रुपयांनी गुंतवणूक सुरू करता येते. गेल्या 3 वर्षात किमान 8.38 टक्के तर कमाल 37.87 टक्के परतावा दिला आहे.
क्वांट फ्लेक्सी कॅप फंड (Quant Flexi Cap Fund)
क्वांट फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड स्कीमने गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 36.08 टक्के परतावा दिला आहे. या फंडमध्ये किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. गेल्या 3 वर्षांत किमान 7.18 टक्के तर कमाल 36.08 टक्के परतावा दिला आहे.
क्वांट मिडकॅप फंड (Quant Mid-Cap Fund)
क्वांट मिडकॅप म्युच्युअल फंड स्कीमने गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 34.66 टक्के परतावा दिला आहे. या फंडमध्ये किमान गुंतवणूक 1 हजार रुपयांनी सुरू करता येते. गेल्या 3 वर्षांत किमान 13.40 टक्के तर कमाल 34.66 टक्के परतावा या फंड स्कीमने दिला आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजार/म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)