IDBI Bank Insurance Scheme: लाइफ इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करणे हा देखील एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. लाइफ इन्शुरन्समुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुमची तयारी एलआयसी करून देते.
भारतीय आयुर्विमा महामंडळाचे भांडवली पाठबळ लाभलेली आयडीबीआय बँक आता एलआयसीची कॉर्पोरेट एजंट म्हणून सेवा देत आहे. LIC आणि IDBI बँक यांच्यात झालेल्या करारामुळे एलआयसीच्या सर्व पॉलिसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
आयडीबीआय बँकेच्या देशभरात अठराशे शाखा असून या बँकेचे 1.8 कोटी ग्राहक आहेत. या सर्व शाखांमध्ये एलआयसीच्या पॉलिसी ग्राहकांना विकत घेता येऊ शकते. यासाठी बँकेला कमिशन मिळते. याशिवाय, ग्राहकांना या बँकेच्या शाखेत पॉलिसींचे प्रीमियमदेखील भरता येतील. यामुळे बँकेला मोठ्या प्रमाणावर रोकड उपलब्धता होईल.
Table of contents [Show]
IDBI बँक लाइफ इन्शुरन्सचे फायदे
पॉलिसी सहज घेता येते
मेडिकल टेस्ट नाही
लांबलचक कागदपत्रे नाही
3 लाख रुपयांपर्यंतचे जीवन कवच
अपघाती मृत्यू झाल्यास विम्याच्या रकमेइतके अतिरिक्त कव्हर
अर्ज कसा करायचा?
बँकेत कॉल करून माहिती घेऊ शकता.
जवळच्या शाखेला भेट देवून अप्लाय करू शकता.
बँक प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतील.