Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC's New Jeevan Shanti 2023: एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीमधून मिळू शकतो वार्षिक इन्सेंटिव्ह!

LIC's New Jeevan Shanti 2023

LIC's New Jeevan Shanti 2023: LIC च्या New Jeevan Shanti 2023 या पॉलिसीच्या खरेदीवर पॉलिसीधारकांना प्रति 1 हजार रुपयांच्या खरेदीवर 3 ते 9.75 रुपये इन्सेंटिव्हज् मिळणार आहे.

आज देखील इन्सुरन्स प्रॉडक्टची चौकशी करताना, विमा-पॉलिसी बाबत बोलताना आपल्याकडून सहजपणे उदगार निघतात,  "XYZ कंपनीची LIC कशी आहे ?" किंवा "मी काल ABC कंपनीची LIC घेतलीये.." LIC अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ ग्राहकांच्या विश्वासार्हतेचा कोड-वर्ड झालीये. कंपनी देखील वेळोवेळी ग्राहकांना पॉलिसी आणि संबंधित बाबींचे जास्तीत जास्त लाभ मिळत राहावेत, म्हणून नव-नवीन प्लॅन्स, तसेच चालु असलेले प्लॅन्स अधिक सुधारित फीचर्ससहित इन्शुरन्स-मार्केटमध्ये आणत असते. 

आता देखील LIC ने नवीन जीवन शांती 2023 (प्लॅन क्र. 858) या ॲन्युइटी प्लॅनसाठी वार्षिकी दर (Annuity Rate) सुधारित केले आहेत. 5 जानेवारी 2023 पासून या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या नवीन पॉलिसीधारकांना आता वर्धित ॲन्युइटी दर मिळणार आहेत. नवीन जीवन शांती योजनेसाठी उच्च खरेदी किमतीसाठी इन्सेंटिव्हज् देखील वाढवले आहेत. पॉलिसीधारकांना आता 3 रुपये ते 9.75 रुपये प्रति 1000 रुपये खरेदी किमतीवर इन्सेंटिव्हज् मिळू शकतो. अर्थात हे इन्सेंटिव्हज्, खरेदी किंमत आणि निवडलेल्या स्थगित कालावधीवर (Purchasing Price & Deferment Period) अवलंबून असेल.

LIC चा न्यू जीवन शांती प्लॅन काय आहे?

ही विशेष ॲन्यूईटी पॉलिसी आहे, जी पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम गुंतवून आजीवन पेन्शन प्रदान करते. ही सिंगल-प्रीमियम, गैर-भागीदारी (नॉन-पार्टीसिपेंटिंग), वार्षिकी योजना आहे, पॉलिसीच्या प्रारंभापासून गॅरंटीड ॲन्यूईटी दर ऑफर करते. “नवीन जीवन शांती प्लॅन 2023” वर्किंग प्रोफेशनल्स आणि स्वयंरोजगार व्यावसायिकांसाठी योग्य असू शकते, विशेषतः विशेषतः जे तरुण व्यावसायिक त्यांच्या निवृत्तीची योजना सुरुवातीच्या टप्प्यापासूनच करू शकतात आणि  भविष्यातील नियमित उत्पन्नाचा प्लॅन आखू इच्छितात. गुंतवणुकीसाठी जास्तीचे पैसे असलेल्या लोकांसाठी देखील ही योजना योग्य असू शकते.

डिफर्ड अ‍ॅन्युइटीचे पर्याय

न्यू जीवन शांती योजनेमधून आपल्याला डिफर्ड अ‍ॅन्युइटी पर्याय (Deferred Annuity Option) दोन ऑपशन्समध्ये उपलब्ध होतात. 

डिफर्ड अ‍ॅन्युइटी फॉर सिंगल लाईफ (Deferred Annuity for Single Life)

या पर्यायामध्ये, आपण एका व्यक्तीसाठी पेन्शन योजना खरेदी करू शकतो. पॉलिसीधारकाला एका ठरावीक काळानंतर पेंशन मिळणे सुरू होते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील पैसे नॉमिनीला मिळतात.

डिफर्ड अ‍ॅन्युइटी फॉर जॉइंट लाईफ (Deferred Annuity for Joint Life) 

या पर्यायांतर्गत जर दोघा सह-पॉलिसीधारकांपैकी कोणा एका पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर सह-पॉलिसीधारकाला पेंशन मिळते. आणि दोघांचा मृत्यू झाल्यास, त्या पॉलिसीमध्ये राहिलेला पैसा त्यांच्या नॉमिनीला मिळतो.

न्यू जीवन शांती प्लॅनची वैशिष्ट्ये काय आहेत?

  • न्यू जीवन शांती योजनेची किमान खरेदी किंमत 1.5 लाख रुपये आहे. याच्या कमाल खरेदी किमतीवर मर्यादा नाही. 
  • जीवन शांती योजना खरेदी करण्यासाठी, वयोमर्यादा किमान 30 ते कमाल 79 वर्षे निश्चित करण्यात आलेली आहे.
  • आपण पॉलिसी अगदी 1 वर्षापासून ते 12 वर्षांपर्यंतच्या डेफरमेंट कालावधीसाठी (Deferment Period) घेऊ शकतो. 
  • वयाच्या 31 वर्षांपासून ते 80 वर्षांच्या दरम्यान पेन्शन किंवा ॲन्यूईटीचा लाभ मिळण्याची सुविधा या प्लॅन अंतर्गत असणार आहे. 
  • या पॉलिसी-टर्मच्या दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला मृत्यू लाभ (Death Benefit) मिळतो. 
  • LIC जीवन शांती योजनेवरही कर्ज मिळू शकते. तसेच पॉलिसी सरेंडर करायची असल्यास तसादेखील पर्याय या योजनेत उपलब्ध आहे. 
  • इलेक्ट्रॉनिक आणि फिजिकल पॉलिसी मिळाल्यापासून 30 दिवसांचा फ्री-लूक कॅन्सलेशन कालावधी देखील देण्यात आला आहे. 


LIC जीवन शांती योजना खरेदी करण्यासाठी आपण "ऑनलाईन" आणि "ऑफलाईन" पद्धतीचा वापर करू शकतो. ही पॉलिसी एलआयसी एजंटद्वारे किंवा जवळच्या एलआयसी कार्यालयातून ऑफलाईन खरेदी करता येते. तसेच, LIC च्या www.licindia.in या अधिकृत वेबसाईटवरूनही खरेदी करता येते.