Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPFO miss call service: जाणून घ्या, EPFO miss call service बद्दल

EPFO miss call service

EPFO miss call service: प्रत्येक नोकरदार कर्मचारी आणि कंपनीला पीएफची रक्कम (Amount of PF) ईपीएफओकडे (EPFO) जमा करावी लागते. बहुतांश कर्मचारी निवृत्तीनंतर दरमहा पगारातून कापलेली रक्कम घेतात. नोकरी करत असताना किंवा त्यानंतर तुमच्या पीएफची रक्कम जाणून घेणे खूप सोपे आहे.

EPFO miss call service: प्रत्येक नोकरदार कर्मचारी आणि कंपनीला पीएफची रक्कम (Amount of PF) ईपीएफओकडे (EPFO) जमा करावी लागते. बहुतांश कर्मचारी निवृत्तीनंतर दरमहा पगारातून कापलेली रक्कम घेतात. परंतु, नोकरी बदलताना किंवा ईपीएफचे पैसे ट्रान्सफर करताना, लोकांना त्यांच्या खात्यात किती पैसे आहेत  माहिती नसते. नोकरी करत असताना किंवा त्यानंतर तुमच्या पीएफची रक्कम जाणून घेणे खूप सोपे आहे. तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम चेक करायची असेल, तर तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कार्यालयात (Employees Provident Fund Organization Office) जाण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्या इंटरनेट शिवाय पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम चेक करू शकता, EPFO miss call service च्या माध्यमातून. 

ईपीएफ बॅलन्स आणि पासबुक ऑनलाइन कसे चेक करू शकता? (How to check EPF balance and passbook online?)

  • ईपीएफओने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ईपीएफ शिल्लक चेक करण्याची सुविधा दिली आहे. 
  • भविष्य निर्वाह निधी खातेधारकाला UAN क्रमांक आणि त्याचा पासवर्ड टाकावा लागेल.
  • वेबसाइटवर UAN क्रमांक आणि पासवर्ड टाकल्यानंतर, पासबुक पहा बटणावर क्लिक करा आणि तुम्हाला शिल्लक कळेल.

मिस्ड कॉलद्वारे पीएफची रक्कम चेक करू शकता. (You can check PF amount through missed call.)

इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही मिनिटात पीएफ खाते चेक करू शकता. त्याशिवाय जर फक्त मिस्ड कॉलद्वारे तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर, यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस कॉल द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला ईपीएफओने जारी केलेल्या हेल्पलाइन क्रमांक 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल. यानंतर, काही मिनिटांत, तुम्हाला मॅसेजद्वारे पीएफ खात्यात जमा झालेल्या पैशांची माहिती मिळेल.

मेसेजद्वारे पीएफची रक्कम चेक करू शकता. (You can check the PF amount through message.)

तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून एसएमएस देखील पाठवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समधून 738299899या क्रमांकावर एसएमएस SMS पाठवावा लागेल. यानंतर, EPFO ​​काही मिनिटांत तुमच्या मोबाइल खात्यावर जमा केलेली रक्कम एसएमएसद्वारे पाठवेल. या दोन्ही पद्धतींसह, तुम्ही इंटरनेटशिवायही पीएफ खात्यातील शिल्लक सहज चेक करू शकता.

मिस्ड कॉल सेवेचे फायदे (Benefits of Missed Call Service)

मिस्ड कॉल सेवा लोकप्रिय आहे कारण  ईपीएफ शिल्लक जाणून घेण्याची ही सर्वोत्तम पद्धत आहे.  यासाठी कोणत्याही स्मार्टफोनची गरज नाही. तुम्ही कोणत्याही फोनवरून मिस्ड कॉल देऊ शकता.  मिसिंग कॉल मेसेजिंगपेक्षा सोपे आहे. यासाठी तुम्हाला पैसे देण्याचीही गरज नाही.