Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp Banking: माहित करून घ्या, Bank of Maharashtra च्या WhatsApp बँकिंग सेवेबद्दल!

WhatsApp Banking

WhatsApp Banking: अनेक बँकानी मोबाइल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग सुरू केल्या आहेत. काही बँकानी स्वतःचे app सुद्धा लाँच केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने सुद्धा (Bank of Maharashtra) आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. त्याबद्दल माहित करून घेऊया.

WhatsApp Banking: डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक क्षेत्र त्यांच्या पद्धतीने मदत करीत आहे. बँक, व्यवसाय, कंपनी, शाळा, कॉलेज हे सर्व कोणत्या न कोणत्या माध्यमातून डिजिटलायझेशन त्यांच्या क्षेत्रात समाविष्ट करीत आहे. अनेक बँकानी मोबाइल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग सुरू केल्या आहेत. काही बँकानी स्वतःचे app सुद्धा लाँच केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank of Maharashtra) सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. त्याबद्दल माहित करून घेऊया. 

WhatsApp बँकिंगचा उद्देश (Purpose of WhatsApp Banking) 

  • ग्राहकांना बँक शिल्लक, मिनी स्टेटमेंट, चेक स्टेटस चौकशी, चेक बुक विनंती,एटीएम शाखा(Bank Balance, Mini Statement, Check Status Enquiry, Check Book Request, ATM Branch) शोधणे यासारख्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात. 
  • मोबाइल वरुन पाहिजे तेव्हा ग्राहकांना माहिती उपलब्ध व्हावी. 
  • नेहमी बँकमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. 
  • मॅसेजवर सविस्तर माहिती मिळावी. 
  • WhatsApp बँकिंग सेवा (WhatsApp Banking Services) ग्राहकांना दैनंदिन बँकिंग आवश्यकतांसाठी सोईस्कर होईल. 

बँकेचा WhatsApp क्रमांक (Bank's WhatsApp Number)

बँक ऑफ महाराष्ट्रने सांगितले की, WhatsApp बँकिंग सेवा वापरकर्त्याद्वारे बँकेचा WhatsApp क्रमांक (7066036640) त्यांच्या फोनमध्ये सेव्ह करून आणि या नंबरवर ‘हाय’ संदेश पाठवून सक्रिय केला जाऊ शकतो. बँक बॅलन्स चौकशी, मिनी स्टेटमेंट, चेक स्टेटस चौकशी, चेक बुक रिक्वेस्ट, लोकेट ब्रँच आणि एटीएम यासारख्या सेवा देत आहे. WhatsApp बँकिंग सेवा Android आणि iPhone दोन्हीसाठी उपलब्ध आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र FD व्याजदर (Bank of Maharashtra FD Interest Rate) 

बँक ऑफ महाराष्ट्र (BoM) ने 2 कोटींपेक्षा कमी किरकोळ एफडीवर नवीन दर लागू केले आहेत. व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, 7 दिवस ते 5 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वरील व्याज दर 2.75% ते 5.75% पर्यंत आहे. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्र आता 'महा धनवर्ष ठेव योजने'मध्ये 400 दिवसांवर जास्तीत जास्त 6.30% व्याज देत आहे. बँक 7 दिवस ते 30 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर 2.75% व्याज देत आहे.