REITs (real estate investment trust) या या म्युच्युअल फंडाप्रमाणे काम करतात. म्युच्युअल फंडची स्कीम गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करुन शेअर्स आणि बॉन्डमध्ये गुंतवणूक करते. तसेच, REIT देखील गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करते. या REITs चे 8 प्रकार कोणते ते जाणून घेऊया.
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे 8 प्रकार
ऑफिस REITs - या प्रकारची रिट ही ऑफिस लोकेशन्समध्ये गुंतवणूक करते. ऑफिस लोकेशन्स विकत घेऊन भाड्याने दिल्या जातात. औद्योगिक REITs - या प्रकारच्या रिट warehouses आणि industrial space मध्ये गुंतवणूक करतात.
रिटेल REITs – या रिट शॉपिंग मॉल्स आणि स्टोअर्समध्ये गुंतवणूक करतात. आणि ही प्रॉपर्टी भाड्याने दिली जाते.
रिसॉर्ट REITs – या रिट हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये गुंतवणूक करतात. या हॉटेल आणि रिसॉर्टची मालकी मिळाल्यावर त्या भाड्याने देतात.
रेसिडेंशीयल REITs – या रिट घरं आणि अपार्टमेंट्स यामधध्ये गुंतवणूक करतात. यानंतर ही प्रॉपर्टी भाड्याने देतात.
हेल्थकेअर REITs – या रिट हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम्स या प्रकारच्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात.
Mortage REIT – या रिट mortagages मध्ये गुंतवणूक करतात.
diversified REITs – या रिट वेगवेगळ्या टाइपच्या रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात. यानंतर ही प्रॉपर्टी भाड्याने देतात.
रिट ज्या प्रकारच्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. त्यानुसार हे 8 प्रकार पडतात. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची तर त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. मात्र ते ज्यांना शक्य नसते त्यांना REIT हा पर्याय उपलब्ध असतो. तसेच रिअल इस्टेट मध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करताना त्यात स्वत: सर्व व्यवहारात लक्ष घालाव लागत. निर्णय घ्यावे लागतात. मात्र इथे तज्ञ हे काम करत असतात.
सेबीने REIT साठी 2015 मध्ये नियम तयार केले होते. REIT ला त्यांच्या फंडसपैकी 80 टक्के रक्कम पूर्णपणे तयार आणि भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवणे आवश्यक असते. नियमित उत्पन्न मिळवणे असा त्याचा उद्देश असतो. SEBI च्या सूचनेनुसार, REIT ला त्याच्या उत्पन्नाच्या 90% युनिट गुंतवणूकदारांना वितरित करावे लागतात. ही रक्कम युनिटधारकांना लाभांश किंवा व्याजाच्या स्वरूपात दिल्या जातात. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या REIT मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर नियमित परतावा (रिटर्न) मिळवण्याची संधी देते.