Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kia Electric Car: एका चार्जिंगमध्ये तब्बल 708 किमी धावते, कियाच्या या इलेक्ट्रिक कारची मार्केटमध्ये धूम

Kia Electric Car EV6

Kia Electric Car: भारतात वीजेवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारींची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. किया कंपनीची इम्पोर्टेड कार 'किया ईव्ही6'ने इलेक्ट्रिक कारच्या श्रेणीत जबरदस्त कामगिरी केली आहे. एका चार्जिंगमध्ये ही कार 708 किमी धावते, असा दावा किया कंपनीने केला आहे.

वाहन निर्मितीतील दक्षिण कोरियन कंपनी किया मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारने सध्या ईव्ही मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. किया ईव्ही6 (Kia EV6) ही इलेक्ट्रिक कार  एका चार्जिंगमध्ये ही कार 708 किमी धावते, असा दावा किया कंपनीने केला आहे. Kia EV6 ही पूर्णपणे इम्पोर्टेड कार असून या कारची किंमत 59.95 लाख रुपये इतकी आहे.

किया कंपनीकडून भारतात एकमेव Kia EV6 ही इलेक्ट्रिक कार जून 2022 मध्ये लॉंच करण्यात आली होती.ही कार पूर्णपणे आयात करण्यात आलेली आहे. या कारच्या जबरदस्त मायलेजने ग्राहकांना वेड लावले आहे. किया ईव्ही6 ची आतापर्यंत 200 हून अधिक मॉडेल्सची कंपनीने विक्री केली आहे. कियाने भारतासाठी केवळ 100 ईव्ही6 मोटारी उपलब्ध केल्या होत्या मात्र ग्राहकांकडून या मोटारीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. जून ते डिसेंबर या काळात 200 हून अधिक किया ईव्ही 6 ची विक्री झाली आहे.


भारतात दाखल झालेल्या  Kia EV6 या कारमध्ये 77.4 किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे. जागतिक पातळीवर या कारची कामगिरी पाहता कार एका चार्जिंगमध्ये 528 किमीचे अंतर पार करते. मात्र भारतासाठी तयार करण्यात आलेल्या Kia EV6 ने एका चार्जिंगमध्ये 708 किमीचा टप्पा पार केल्याचे ARAI च्या टेस्ट ड्राईव्हमध्ये दिसून आले आहे. 

Kia EV6 मध्ये 50 किलोवॅटचा DC चार्जर असून ही कार 73 मिनिटांत 10 ते 80% चार्ज होते. या कारच्या RWD मॉडेलमध्ये सिंगल मोटर असून 229 bhp पॉवर आहे. Kia EV6  चे RWD मॉडेलची किंमत 59.95 लाख रुपये आहे. AWD मॉडेलची किंमत 64.95 लाख एक्सशोरुम आहे. Kia EV6 ही मिनि कूपर एसई, वोल्वो xc40 रिचार्ज आणि Hyundai Ioniq 5  या मोटारींशी स्पर्धा करेल.