Jobs in India 2023: जगभरात आर्थिक मंदीमुळे अनेक टेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना नोकरीतून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. शेकडो कंपन्या आपला खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आले आहे. दुसरीकडे, भारतात या मंदीचा तुलनेने कमी परिणाम जाणवत आहे. तर, देशातील टेक किंवा आयटी सेक्टर व्यतिरीक्त अनेक क्षेत्रात हजारो नवीन नोकऱ्यांच्या ऑफर दिल्या जात आहेत. ग्लोबल एम्प्लॉयमेंट वेबसाइटच्या मासिक डेटामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे.
या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मागणी वाढली (Increased the demand for employees)
ग्लोबल एमप्लॉयमेंटच्या अहवालानुसार, भारतात वैद्यकीय, बांधकाम, शिक्षण, ऑपरेशन सर्व्हिस आदी क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषत: नॉन-टेक्नॉलॉजी क्षेत्रात कुशल तरुणांची मागणी वाढत आहे. याशिवाय साबर सिक्युरीटीमध्ये देशभरात जवळपास ज्युनिअर, सिनिअर पदे पकडून 7 लाख कर्मचाऱ्यांची गरज आहे. बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्यांमधून लोकांना काढून टाकले जात असताना ही मोठी नोकर भरती आशादायक आहे.
आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये, दंत चिकित्सा आणि नर्सिंग सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी जास्तीत जास्त अर्ज मागवण्यात आले आहेत. यासोबतच अन्न ऑपरेशन सेवेत 8.8 टक्के, बांधकाम क्षेत्रात 8.3 टक्के, वास्तुविशारद अर्थात आर्किटेक्ट क्षेत्रात 7.2 टक्के, शिक्षण 7.1 टक्के, थेरपी 6.3 टक्के आणि विपणन 6.1 टक्के या क्षेत्रातील नोकऱ्यांच्या जाहिराती काढण्यात आल्या आहेत.
देशातील बांधकाम आणि अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रांमध्ये कोरोना महामारीनंतर, व्यवसाय एकप्रकारे रुळावर येत आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात मार्केटिंग क्षेत्रात खूप वाढ झाली आहे, ज्याने लोकांना आधी कामावरून काढून टाकले. गेल्या वर्षभरात, ब्रँड्सना ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी मार्केटिंगची गरज समजली आहे तसेच व्यापार आणि विक्रीतून मागणी वाढली आहे.
अहवालानुसार, गेल्या वर्षी 2021 ते डिसेंबर 2022 पर्यंत, बेंगळुरू 16.5 टक्के नोकऱ्या देण्यामध्ये आघाडीवर आहे. तसेच मुंबई 8.23 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिच संख्या पुण्यात 6.33 टक्के आणि चेन्नईत 6.1 टक्के आहे. अहमदाबाद, कोईम्बतूर, कोची, जयपूर आणि मोहाली सारख्या टियर 2 शहरांमधून 6.9 टक्के नोकरीचे अर्ज मागवण्यात आले आहेत. यावरून छोट्या शहरांमध्ये नोकऱ्यांची मागणी वाढत असल्याचे दिसून आले आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            