Reliance Jio FIFA World Cup 2022 Plan : रिलायन्स जिओने फिफा वर्ल्ड कप 2022 पाहणाऱ्या फुटबॉलप्रेमींसाठी नवीन रोमिंग प्लॅन लॉन्च केला आहे. हे सर्व नवीन प्लॅन कतार, संयुक्त अरब अमिरीती आणि सौदी अरेबियाला जाणाऱ्या फुटबॉलप्रेमींसाठी ऑफर लॉन्च केली. हे प्लॅन ग्राहक MyJio App किंवा Jio.com या वेबसाईटवरून रजिस्टर करू शकतात. उद्यापासून (दि.20 नोव्हेंबर) FIFA World Cup 2022 सुरू होत आहे. या मॅच प्रत्यक्ष पाहण्यासाठी भारतातून बरेच फॅन्स कतारला जाणार आहेत. त्यामुळे जिओने हे नवीन इंटरनॅशनल रोमिंगवाले प्लॅन (Football World Cup - Jio International Roming Plan) लॉन्च केले आहेत.
Table of contents [Show]
काय आहेत इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन!
जिओने 6,799 रुपयांचा इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन 30 दिवसांच्या मुदतीसह उपलब्ध आहे. त्यासोबत यामध्ये 500 मिनिटे लोक व्हॉईस कॉल आणि अतिरिक्त 500 मिनिटे इनकमिंग कॉल मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना 5GB डेटासोबत 100 SMS ची सुविधा मिळणार आहे. इनकमिंगची ठरवून दिलेली मुदत संपल्यानंतर पुढील प्रत्येक मिनिटासाठी ग्राहकांकडून 1 रुपया दर आकारला जाणार आहे. तसेच आऊटगोईंग कॉलची मर्यादा संपल्यानंतर PayGo चे दर लागू होतील.
5,122 रुपयांचा डेटा रोमिंग प्लॅन!
हा प्लॅन 21 दिवसांच्या मुदतीसह उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना 5GB डेटा मिळणार असून, डेटाची लिमिट संपल्यानंतर PayGoचे दर लागू होतील.
3,999 रुपयांचा इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन!
3,999 रुपयांचा इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन 30 दिवसांच्या मुदतीसह उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना 250 मिनिटे लोकल व्हॉईल कॉल आणि अतिरिक्त 250 मिनिटांचा इनकमिंग कॉल मिळणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना 3GB डेटासोबत 100 एसएमएस करता येणार आहेत.
1,122 रुपयांचा डेटा रोमिंग प्लॅन!
हा प्लॅन 5 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना 1 GB डेटा मिळणार आहे. हा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना पुढील प्रत्येक डाऊनलोडिंग आणि अपलोडिंगसाठी PayGo चे दर भरावे लागणार आहेत.
1,599 रुपयांचा इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन!
1,599 रुपयांचा इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन फक्त 15 दिवसांच्या मुदतीसह (Validity) उपलब्ध आहे आणि यामध्ये ग्राहकांना 150 मिनिटे लोकल व्हॉईस कॉल आणि अतिरिक्त 150 मिनिटे इनकमिंग कॉल मिळणार आहे. त्याचबरोबर 1GB डेटा आणि 100 SMS करण्याची सुविधा मिळणार आहे.