देशातील महत्वाचा समजल्या जाणाऱ्या रिलायन्स समूहाच्या बाबतीत एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे. वित्तीय सहाय्य सेवा पुरविणाऱ्या Jio Financial Services Limited आणि अमेरिकेतील नावाजलेल्या BlackRock या दोन कंपन्यांनी एकमेकांशी करार केला आहे. या कराराद्वारे भारतातील करोडो गुंतवणूकदारांना अधिकाधिक फायनान्स सुविधा पोहोचविण्याचा या दोन्ही कंपन्यांचा विचार आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत भारतीय गुतंवणूकदारांना नाविन्यपूर्ण गुंतवणूक सोल्यूशन्स प्रदान करणे हे या कराराचे मुख्य उद्देश आहे असे सांगितले जात आहे.
डिजिटल-फर्स्ट ऑफर!
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येत भारतात Digital First Offer देण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे देशभरातील गुंतवणूकदारांना डिजिटल पोर्टलच्या आणि ॲपच्या माध्यमातून फायनान्स विषयक सुविधा आणि मार्गदर्शन पुरवले जाणार आहे. भारतात ‘डिजिटल इंडिया’ कां प्रचार आणि प्रसार सुरु झाल्यापासून भारतीयांनी ऑनलाईन व्यवहार करायला सुरुवाट केली आहे. UPI पेमेंटच्या बाबतीतही भारतीय ग्राहकांनी नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना ‘डिजिटल-फर्स्ट ऑफर’ दिली जाणार आहे.
Jio Financial Services is not yet listed but here comes the first announcement already -
— Aditya Kondawar (@aditya_kondawar) July 26, 2023
Jio Financial and Blackrock to form JV to enter the Indian Asset Management Industry
BlackRock is the world's largest asset manager, with US$8.59 trillion in AUM (Dec 2022)
No reco pic.twitter.com/dke4eWVDol
अशी असेल भागीदारी
या संयुक्त उपक्रमात, Blackrock Inc.आणि Jio Financial Services ची टक्केवारी 50-50 टक्के असणार आहे. डिजिटल फर्स्ट ऑफरद्वारे भारतातील गुंतवणूकदारांसाठी मालमत्ता व्यवस्थापन उद्योग सुलभ करणे हे भागीदारीचे उद्दिष्ट आहे. 150 दशलक्ष डॉलरच्या प्रारंभिक योजनेवर सध्या या दोन्ही कंपन्या काम करणार आहेत. यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरु असून, ती पूर्ण झाल्यानंतर लवकरच याचे ऑपरेशन सुरु होणार आहे. Blackrock ही अमेरिकन कंपनी जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजर (Asset Manager) कंपनी म्हणून ओळखली जाते. रिलायन्स उद्योगसमूहाशी हातमिळवणी केल्यानंतर या कंपनीला भारतात देखील सेवा देता येणार आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संसाधनांचा आणि ज्ञानाचा तसेच BlackRock च्या गुंतवणूक कौशल्याचा फायदा घेऊन भारतातील लाखो गुंतवणूकदारांना स्वस्त आणि नाविन्यपूर्ण गुंतवणूक उपाय प्रदान करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे.