Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

5G Network In India: भारतभर 5G जी इंटरनेट कधीपर्यंत पोहचणार; जिओ, एअरटेलने केला खुलासा

5G network

भारतभर 5G इंटरनेट सुविधा कधीपर्यंत पोहचले याबाबतही जिओ आणि एअरटेलने खुलासा केला आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागात फास्ट इंटरनेट पोहचण्यासाठी आणखी काही काळ भारतीयांना वाट पहावी लागणार आहे. सध्या मोठ्या शहरांमध्ये 5G नेटवर्क वाढवण्याचे काम सुरू आहे.

मोबाईल नेटवर्कमधील आघाडीची कंपनी जिओने 5G सेवा  भारतातील आणखी 34 शहरांमध्ये लाँच केली आहे. या आधी 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये ही सेवा सुरू केली आहे. तर एअरटेलने आणखी 10 शहरांमध्ये 5G सेवा नव्याने सुरू केली आहे. 5G ची स्पर्धेत एअरटेलपेक्षा जिओ आघाडीवर असून इंटरनेट आणि मोबाईल सेवा पुरवण्यामध्ये जिओची मक्तेदारी आहे. भारतभर 5G इंटरनेट सुविधा कधीपर्यंत पोहचले याबाबतही जिओ आणि एअरटेलने खुलासा केला आहे.

जिओ, एअरटेलकडून वेलकम ऑफर( Jio, Airtel 5G welcome offer)

एअरटेल आणि जिओ दोन्ही कंपन्यांनी ऑक्टोबर 2022 पासून देशभरात 5G सेवेचा विस्तार सुरू केला आहे. जिओची 5G सेवा देशातील 225 शहरांमध्ये उपलब्ध आहे. तर एअरटेलची 5G प्लस सेवा 65 शहरांमध्ये उपलब्ध आहे. ईशान्य भारतातील दुर्गम भागातही फास्ट इंटरनेट पोहचले आहे.  5G इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना सीम कार्ड बदलण्याची गरज नाही. सध्या वापरात असलेल्या सीमकार्डवरही सेवेचा लाभ घेता येईल. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी वेलकम ऑफर लाँच केल्या आहेत. सुरुवातीची काही दिवस मोफत 5G सेवेचा लाभ घेता येणार आहे.

भारतभर 5G चे जाळे कधीपर्यंत पसणार? (When will Jio and Airtel 5G reach nationwide)

डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण भारतभर जिओचे 5G इंटरनेट पोहचेल असा दावा रिलायन्सने केला आहे. तर मार्च 2024 पर्यंत भारतभर 5G सेवा सुरू करण्याचा निर्धार एअरटेल कंपनीने केला आहे. सध्या देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू आहे. मात्र, भारताच्या कानाकोपऱ्यात फास्ट इंटरनेट पोहचण्यास वेळ लागणार आहे. ग्रामीण भागात अद्यापही 4G ची चांगली सुविधा नाही. 5G खेडोपाडी पोहचल्यानंतर इंटरनेट स्पीडमध्ये वाढ होऊ शकते.

मागील आठवड्यात रिलायन्सने आजपर्यंतचा सर्वात मोठा ट्रू 5G प्लॅन रोल आऊट केला होता. सहा ईशान्येकडील राज्यांव्यतिरिक्त, रिलायन्स जिओ ट्रू 5G आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगढ,गोवा, हरियाणा, झारखंड, कर्नाटक केरळ, महाराष्ट्र, ओडीसा, पद्दुचेरी, पंजाब,राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश या राज्यातील अनेक शहरात एकाचवेळी सुरू लाँच करण्यात आले.