भारतातील एकेकाळची प्रिमीयम एअरलाईन्स असलेल्या जेट एअरवेजवरील संकटे काही कमी होताना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांपासून जेट एअरवेज पुन्हा झेप घेणार अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरु होत्या मात्र आता कंपनी चर्चेत आली आहे ती वेगळ्याच कारणासाठी. ग्रॅच्युटी थकवल्या प्रकरणी मुंबई जिल्हा प्रशासनाने जेट एअरवेजची तीन विमाने जप्त केली आहेत. जेट एअरवेजने तब्बल 960000 रुपयांची ग्रॅच्युटी थकवली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मुंबई जिल्हा प्रशासनाने जेट एअरवेजची मुंबई विमानतळावरील चार विमाने जप्त केली आहेत. यात तीन बोइंग विमाने आणि एका एअरबस विमानाचा समावेश आहे. जेट एअरवेजचे पुनरुज्जीवर करण्यासाठी नेमलेल्या समितीने ग्रॅच्युटीची देय रक्कम भरणा केलेली नाही. यावर 10% व्याजासह 960000 रुपये इतकी रक्कम थकवली. त्यावर मुंबई जिल्हा प्रशासनाने जप्तीची कारवाई केली.
दुबईतील उद्योजक मुरारी लाल जैन आणि लंडनमधील कालरॉक कॅपिटल या दोघांनी संयुक्तपणे जेट एअरवेजवर मालकी हक्क मिळवला आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी या दोघांना जेट एअरवेजचे मालकी हक्क प्रदान करण्यात आले होते. जेट एअरवेजला पुन्हा सेवेत आणण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. मात्र त्याआधीच विमाने जप्तीची नामुष्की ओढवल्याने पुनरुज्जीवर मोहीमेला धक्का बसला आहे.
जेट एअरवेज कंपनीला मागील काही वर्षांत मोठा तोटा सहन करावा लागला होता. या वाढत्या तोट्यामुळे कंपनीची विमान सेवा बंद पडली होती. कंपनीचे दुबईस्थित नवे मालक मुरारी लाल जलान यांनी कंपनी विकत घेतल्यानंतर कंपनीची विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.