Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jeff Bezos Charity : Amazon चे मालक जेफ बेझोस लाखो डॉलर्स दान करणार

Jeff Bezos Total Wealth, Jeff Bezos Donation , Charity , Amazon

Image Source : www.forbes.com

Jeff Bezos Plans to donate most of his Wealth to Charity : अॅमेझॉनचे संस्थापक आणि मालक जेफ बेझोस (Jeff Bezos, Founder and CEO of Amazon) आपल्या 124 अब्ज डॉलर (जवळपास 10 लाख कोटी) मालमत्तेमधील बहुतांश भाग दान करणार आहेत. जेफ बेझोस यांनी यापूर्वीही अनेक प्रकारे दान केले आहे. यामध्ये प्रिन्सटन विद्यापीठाला कॅन्सर रिसर्चला आणि निर्वासितांच्या मुलांसाठी बेझोस यांनी निधी दिला आहे.

अॅमेझॉनचे संस्थापक आणि मालक जेफ बेझोस (Jeff Bezos, Founder and CEO of Amazon) आपल्या 124 अब्ज डॉलर (जवळपास 10 लाख कोटी) मालमत्तेमधील बहुतांश भाग दान करणार आहेत. काही दिवसांपूर्वी एका परदेशी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही घोषणा केली. त्यावेळी बेझोस यांच्यासोबत त्यांची प्रेयसी लॉरेन सांचेज देखील उपस्थित होती. संपत्तीतील मोठा हिस्सा हवामान बदलाच्या संकटाशी लढण्यासाठी व मानव कल्याणासाठी समर्पित करण्याची योजना आखल्याचे बेझोस यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

प्रेयसीची मदत घेणार 

जेफ बेझोस यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांच्यासोबत त्यांची प्रेयसी लॉरेन सांचेज देखील उपस्थित होती. आपली प्रेयसी लॉरेन सांचेजसोबत संपत्तीमधील मोठा भाग दान करण्याचा निर्णय बेझोस यांनी घेतला आहे. सर्वांनी एकत्र येऊन मानव कल्याणासाठी कार्य केले पाहिजे, असे ते या मुलाखतीत म्हणाले. असे असले तरी बेझोस नक्की किती टक्के संपत्ती दान करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यांनी केवळ संपत्ती दान करणार एवढीच माहिती अद्यापपर्यंत दिली आहे.

काय म्हणाले जेफ बेझोस?

मुलाखतीत त्यांनी म्हटले की, अॅमेझॉनला टॉपवर आणणं जसं सोपं नव्हतं तसेच हा दानाचा निर्णय घेणही सोपा नव्हता. मी आणि माझ्या साथीदारांना अॅमेझॉन कंपनीसाठी खूप मेहनत घ्यावी लागली. मी आणि माझा साथीदार लॉरेन, दोघांनी मिळून परोपकाराचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. काळजीपूर्वक विचार करून हे कार्य पार पाडायचे असल्याचेही बेझोस यावेळी म्हणाले.  

यापूर्वी झाली होती टीका

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या टॉप 5 यादीमध्ये जेफ बेझोस यांचे नाव येते. हवामान बदलाशी लढा देण्यासाठी काम करणाऱ्यांसाठी संपत्तीतील काही भाग दान करण्याचा निर्णय घेतल्याचे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस म्हणाले. दरम्यान, 'द गिव्हींग प्लेज'वर सही न केल्याने बेझोस हे टिकेचे धनी ठरले होते. जगातील काही सर्वांत श्रीमंत व्यक्तींनी एकत्र येत त्यांच्या संपत्तीचा काही मोठा भाग धर्मादाय कारणासाठी दान करण्याच्या उद्देशाने द गिव्हींग प्लेज ही मोहिम सुरु केली. अब्जावधींची संपत्ती असूनही बेझोस दान करत नाहीत, या टिकेला बेझोस यांना नेहमी सामोरे जावे लागते.