Ivana Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे नाव नेहमी चर्चेत असते. भले ते राजकीय असो या कुटंबाशीसंबंधी. तसेच ते बऱ्याच वादग्रस्त विधानामुळेदेखील सातत्याने चर्चेत राहिले आहेत. आता ते पूर्व पत्नीच्या संपत्तीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या पत्नीचे मागील वर्षी निधन झाल असून त्यांनी मृत्यूपत्रात आपली करोडोंची मालमत्ता ट्रम्प नाही, तर घर सांभाळणाऱ्या नैनी डोरोथी (Nanny Dorothy) सह आणखी कोणाच्या नावावर किती केली आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.
नैनी डोरोथीसह कोणाच्या नावावर केली संपत्ती (Naini Dorothy Including the Property in whose Name)
अमेरिकेचे मॅगजीन फोर्ब्स यांच्या माहितीनुसार, इव्हाना यांचे निधन मागील वर्षी जुलैमध्ये झाले होते. त्यांनी आपल्या मागे साधारण 277 करोड रूपयांची संपत्ती मागे सोडली. त्यानी आपल्या मृत्यूपत्रात ट्रम्प नाही तर संपत्तीचे वारस हक्क हे आपली तीन मुले, मुलगी इवांका ट्रम्प, मुले एरिक ट्रम्प व डोनाल्ड ज्यूनियर ट्रम्प यांच्या व्यतिरिक्त त्यांनी सर्वाधिक संपत्ती ही त्यांच्या कुटुंबासाठी कित्येक वर्ष काम करणाऱ्या नैनी डोरोथी यांच्या नावावर केली. त्यांनी पूर्व पती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर मात्र कवडीमोल संपत्तीदेखील केली नाही.
घर सांभाळणाऱ्या नैनी डोरोथी यांच्या नावावर किती संपत्ती (How much wealth is in the name of Naini Dorothy, the Housekeeper)
अमेरिकेचे प्रसिध्द मॅगजीन फोर्ब्समध्ये सांगण्यात आले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पूर्व पत्नी इव्हाना यांनी मृत्यूपत्राच ट्रम्प कुटुंबातील मुलांच्या व्यतिरिक्त सर्वाधिक संपत्तीचा हक्क त्यांनी नैनी डोरोथी यांना दिला आहे. डोरोथी या मागील कित्येक वर्षापासून ट्रम्प कुटुंबाचे घर सांभाळण्याचे काम करित आहेत. त्यांनी त्यांच्या नावावर अंदाजे 10 लाख डाॅलरपेक्षा ही अधिक संपत्ती केली आहे.
इव्हाना यांची नैनी डोरोथीबाबतची भावना(Ivana's feelings for Naini Dorothy)
इव्हाना यांनी 2017 मध्ये ‘राइजिंग ट्रम्प’(Rising Trump) नावाचे एक पुस्तक लिहिले होते. त्यांनी त्या पुस्तकात नैनी डोरोथी यांच्याबद्दल काही भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी त्या पुस्तकात लिहिले आहे की, नैनी डोरोथी या आमच्या कुटुंबासाठी व माझ्यासाठी एक दुसरी आई आहे. मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. त्या आमच्या कुटुंबाचे एक महत्वपूर्ण सदस्य आहेत. त्यांनी माझ्या मुलांना इंग्रजी येत नसतानादेखील इंग्रजी प्रार्थना शिकवली आहे. मी त्यांची खूप ऋणी आहे.