• 04 Oct, 2022 16:15

ITR Filing : अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमधील (AIS ) चूक कशा दुरुस्त करायच्या?

ITR Filing : अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमधील (AIS ) चूक कशा दुरुस्त करायच्या?

ITR Filing : अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS )मध्ये बँका, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आदीमध्ये केलेले व्यवहार, तसेच उत्पन्नाचे तपशील आणि इन्कम टॅक्स विभागाकडे उपलब्ध असलेली माहिती असते. ही माहिती AIS मध्ये योग्य पद्धतीने दाखवली आहे का? याची खात्री करणे आवश्यक आहे.

अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS )मध्ये आपल्या आर्थिक व्यवहारांचा तपशील असतो. इन्कम टॅक्स विभागाने नोव्हेंबर, 2021 मध्ये AIS लॉण्च केले होते. इन्कम टॅक्स विभागाला विविध संस्थांकडून मिळालेल्या आर्थिक व्यवहारांच्या माहितीच्या आधारे इन्कम टॅक्स विभाग AIS  विवरण तयार करते. पण एखाद्याच्या AIS मधील माहिती चुकीच्या पद्धतीने नोंदवली गेल्यास ती संबंधित विभागाच्या लक्षात आणून देऊन त्यात सुधारणा करणे आवश्यक असते.


अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS )मध्ये एखादी त्रुटी असल्यास ती संबंधित विभागाच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. अन्यथा तिथे दिलेली माहीती योग्य असल्याचे गृहित धरून तुम्ही रिटर्न फाईल (Return File) केलेल्या माहितीमध्ये तफावत दिसून येईल आणि यासाठी विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. म्हणून AIS मध्ये त्रुटी आढळून आल्यास त्या दुरूस्त करून घेणं आवश्यक आहे. त्या कशा करायच्या याची माहिती आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत.

अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS )मध्ये त्रुटी असल्यास काय?

जर एखाद्या करदात्याला AIS मध्ये त्रुटी आढळून आल्यास त्याने संबंधित विभागाला ऑनलाईन तक्रार नोंदवावी किंवा फीडबॅक द्यावा. AIS मधील त्रुटी दुरूस्त करण्यासाठी खालील टप्प्प्यांचा वापर करा.

1. इन्कम टॅक्स विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ई-फायलिंग खात्यात लॉगिन करा.

AIS CORRECTION 1
 

2. लॉगिन केल्यानंतर Service या टॅब अंतर्गत अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS ) वर क्लिक करा.

AIS CORRECTION 2
 

3. आता स्क्रिनवर तुम्हाला टॅक्सपेअर इन्फॉर्मेशन समरी (TIS) आणि अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS ) असे दोन पर्याय दिसतील. त्यातील AIS या पर्यायावर क्लिक करा. 

AIS CORRECTION 3
 

4. स्क्रीनवर AIS चा भाग A आणि B दिसेल. भाग A मध्ये तुमची वैयक्तिक माहिती असेल. तर भाग B मध्ये इतर माहिती असेल. त्याखाली असलेले असेसमेंट वर्ष निवडून त्यापुढे असलेल्या Optional या क्लिक करा.

AIS CORRECTION 4
 

5. Optional या क्लिक केल्यावर 7 पर्याय तुम्हाला दिसतील. त्यापैकी तुम्हाला लागू असलेला योग्य पर्याय निवडा. तुम्ही निवडलेल्या पर्यायावर आधारित तुम्हाला अधिकची माहिती विचारली जाऊ शकते.

AIS CORRECTION 5
 

6. आणि सर्वांत शेवटी Submit यावर क्लिक करा.

फीडबॅक सबमिट केल्यानंतर इन्कम टॅक्स विभाग तुमच्या तक्रारीची नोंद घेऊन तुमच्या AIS मधील माहिती दुरूस्त करेल.