Oracle Cernar Layoff : गेल्या आर्थिक वर्षात क्लाउड बिझनेस कंपनी ओरॅकलने Cerner 28.4 अब्ज डॉलरला विकत घेतली होती. तर यावर्षी याच ओरॅकल कंपनीने कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि पदोन्नती थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच क्लाउड व्यवसायातील दिग्गज ओरॅकलने सर्नर युनिटमधून 3000 कर्मचारी काढून टाकले आहे. ओरॅकलच्या सर्नर कंपनीत एकूण 28 हजार कर्मचारी कार्यरत होते.
3,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना केले कमी
ओरॅकलने गेल्या आर्थिक वर्षात 28.4 अब्ज डॉलरमध्ये इलेक्ट्रॉनिक हेल्थ केअर रेकॉर्ड फर्म सर्नरला विकत घेतले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वीच ओरॅकलने या कंपनीतील कर्मचाऱ्यांना 2023 मध्ये कुठल्याही पगारवाढीची अपेक्षा ठेऊ नका, अशा सूचना दिल्या होत्या. ओरॅकलने सर्नरच्या मार्केटिंग, अभियांत्रिकी, अकाउंट, लीगल आणि प्रोडक्शन विभागातील जवळपास 3,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
क्लाउड सेवा देणारी कंपनी सर्नर
ओरॅकलची सर्नर ही क्लाउड सेवा देणारी कंपनी आहे. ही कंपनी राष्ट्रीय आरोग्य रेकॉर्ड डेटाबेस विकसित करते. ज्यामध्ये रुग्णांच्या संपूर्ण नोंदी असतात आणि रुग्णांचा डेटा त्यांच्या संमतीशिवाय इतर कोणाशीही शेअर केला जात नाही, अशी ग्वाही ओरॅकलचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी लॅरी एलिसन यांनी दिलेली आहे. आता ओरॅकल एक नवीन आरोग्य रेकॉर्ड डेटाबेस देखील तयार करत आहे आणि कंपनीने संपूर्ण महामारीमध्ये त्यावर काम केले आहे.चष्मा आणि घरी वैद्यकीय सेवा घेणारे रुग्ण यांचा डेटा जोडण्याची कंपनीची योजना आहे.
काही दिवसांपूर्वीच अॅमेझॉनने हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकणार असल्याची घोषणा केली होती. तसेच युकेमधील सगळ्यात मोठा व्यावसायिक समूह बीटी ग्रुपने 55 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला.