IRCTC Tour Package: भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी एक टुर प्लॅन केला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (Indian Railway Catering and Tourism Corporation) आपल्या रेल्वे टूर पॅकेज अंतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेन चालवणार आहे.
7 रात्री आणि 8 दिवसांच्या या प्रवासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे आणि बौद्ध वारसा यांचा समावेश असेल. हा प्रवास 14 एप्रिल 2023 रोजी दिल्ली सफदरजंग येथून सुरू होईल आणि 21 एप्रिल 2023 रोजी दिल्ली सफदरजंग येथे संपन्न होईल. प्रवासासाठी बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग दिल्ली सफदरजंग, मथुरा आणि आग्रा येथे उपलब्ध आहे. भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमध्ये एकूण 600 प्रवासी बसू शकतात. सर्व डबे थर्ड एसी क्लासचे असतील.
टूर पॅकेजमध्ये समाविष्ट असलेले स्थळ
डॉ. आंबेडकर नगर (महू) | जन्मस्थान |
नागपूर | दीक्षाभूमी |
सांची | स्तूप आणि इतर बौद्ध स्थळे |
वाराणसी (सारनाथ) | काशी विश्वनाथ मंदिर |
गया | महाबोधी मंदिरासह विविध बौद्ध स्थळे |
राजगीर आणि नालंदा | विविध बौद्ध स्थळे |
प्रवास भाडे आणि सुविधा काय असेल?
एका व्यक्तीला प्रति व्यक्ती 29440 रुपये द्यावे लागतील. तिहेरी आणि दुहेरी शेअरिंगची किंमत 21650 रुपये आहे. 5 वर्षे ते 11 वर्षे वयोगटातील मुलांचे भाडे 20380 रुपये आहे. IRCTC रेल टूर पॅकेजमध्ये ऑनबोर्ड ट्रेन जेवण, चांगल्या दर्जाच्या रेस्टॉरंटमध्ये ऑफ-बोर्ड जेवण, बसमधून प्रेक्षणीय स्थळे पाहणे, प्रवाशांसाठी प्रवास विमा इत्यादि सुविधा उपलब्ध आहे. संपूर्ण टुरमध्ये फक्त शाकाहारी जेवण उपलब्ध असेल.
पॅकेजमध्ये काय समाविष्ट असणार नाही?
आंबेडकर यात्रा टूर पॅकेजमध्ये स्मारक प्रवेश शुल्क, बोट राइड, प्रेक्षणीय स्थळांचा खर्च, स्थानिक मार्गदर्शक, वेटर, मार्गदर्शक आणि रूम सर्व्हिस इत्यादींचा समावेश नाही.रेल्वे तिकीट IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक केले जाऊ शकते. याशिवाय, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, क्रिस्टल मॉल आणि सेक्टर 34-ए चंदीगड येथील IRCTC पर्यटक सुविधा केंद्राशीही संपर्क साधता येईल.