भारतात IQoo Neo 7 5G चे लॉन्चिंग पुढील महिन्यात होणार आहे आणि त्याआधी फोनचे फीचर्स इत्यादी दररोज लीक होत आहेत. आता यामध्ये iQoo Neo 7 5G चे डिझाईन देखील समोर आले आहे. समोर आलेल्या डिझाईननुसार, iQoo Neo 7 5G ही iQoo Neo 7 SE ची रिब्रँडेड आवृत्ती असेल आणि हा फोन खासकरून गेमर्ससाठी सादर केला जाईल.
MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर iQoo Neo 7 5G मध्ये उपलब्ध असेल. या प्रोसेसरसह भारतात येणारा हा पहिला फोन असेल. iQoo Neo 7 5G भारतात दोन रंगात सादर केला जाईल. iQoo Neo 7 5G चे लॉन्चिंग 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. iQoo Neo 7 5G ला भारतात 3D कूलिंग सिस्टमसह 120W फ्लॅश चार्जिंग मिळेल. फोनचा AnTuTu स्कोअर 890000+ आहे. iQoo Neo 7 5G च्या भारतीय प्रकारात 6.78-इंचाचा 120Hz E5 AMOLED डिस्प्ले आहे. याशिवाय तीन रियर कॅमेरे उपलब्ध असतील.
iQoo Neo 7 5G मध्ये पंचहोल स्टाईलमध्ये सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल. आगामी फोनची फीचर्स iQoo Neo 7 SE सारखीच असतील. iQoo Neo 7 SE चीनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. यात 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये 120W फ्लॅश चार्जिंग उपलब्ध असेल.I
Qoo Neo 7 5G मधील कॅमेरा
या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 64 मेगापिक्सेल आहे. कॅमेरासह ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देखील आहे. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. समोर 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.