Sport Insurance Covers : इंडियन प्रीमियर लीग मध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला.इंडियन प्रीमियर लीगचा हा 16 वा हंगाम आहे. IPL ची सुरुवात 2008 मध्ये सुरु झाली. तेव्हापासुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), फ्रँचायझी मालक, प्रायोजक, प्रसारक, स्टेडियम आणि खेळाडूंसह विविध भागधारकांसाठी मोठ मोठ्या बोली लावल्या गेल्या. तर यावर्षी बीसीसीआयने या हंगामात मीडिया हक्कांच्या विक्रीतून 48,000 कोटी रुपयांहून अधिक कमावले. 2018 मध्ये मिळालेल्या किंमतीपेक्षा ही किंमत तिप्पट आहे आणि आता युनायटेड स्टेट्स नॅशनल फुटबॉल लीग (NFL)नंतरची ही दुसरी सर्वात महागडी क्रीडा स्पर्धा आहे.
का घेतली जाते विमा सुरक्षा
विविध भागधारकांच्या मोठ्या खर्चाच्या क्षमतेसह, इंडियन प्रीमियर लीगचे मूल्य यावर्षी सुमारे 10,000 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जोखीम कमी करण्यासाठी विविध भागधारकांनी विविध प्रकारचे विमा कवच घेतले आहेत, जेणेकरुन कोणत्याही प्रकारे पैश्यांचे नुकसान झाल्यास ते भरुन काढता यायला हवे.
आयपीएलमधील विविध भागधारकांमध्ये बीसीसीआय,प्रसारक,प्रायोजक, फ्रँचायझी मालक आणि सहायक सेवा प्रदाते यांचा समावेश आहे. त्यामुळे हवामानाच्या समस्या, कुठल्याही प्रकारची दंगल झाल्यास, खेळाडूंवर लावलेल्या पैश्यांचे नुकसान, खेळाडूशी संबंधित जोखीम, जसे की अपघात किंवा दुखापत किंवा आजारामुळे खेळाडूवर लावलेले पैसे गमावणे आणि वैद्यकीय खर्च यासारख्या अनपेक्षित घटनांमुळे, किंवा इव्हेंट रद्द झाल्यामुळे होणारे कोणतेही पैश्यांचे नुकसान भरून काढणे आवश्यक असते. यासाठी विमा काढला जातो.
आयपीएलशी संबंधित विमा कितीचा असणार
आयपीएल ही आशियातील सर्वात मोठी स्पोर्टिंग लीग आहे आणि नवीन खेळाडूंच्या उपस्थितीमुळे आणि संपूर्ण आयपीएल इकोसिस्टममध्ये गुंतलेल्या विविध भागधारकांच्या मोठ्या आणि सतत वाढत्या खर्च क्षमतेमुळे या वर्षी एकूण एक्सपोजर 10,000 कोटी रुपयांच्या वर जाण्याचा अंदाज आहे, असे मत अलायन्स इन्शुरन्स ब्रोकर्सचे क्रीडा सहयोगी संचालक - शाइस्ता वालजी यांनी व्यक्त केले.
कश्यावर मिळते विमा रक्कम
IPL इव्हेंट अंतर्गत विविध स्टेकहोल्डर्सनी घेतलेल्या विमा अंतर्गत प्रतिकूल हवामान परिस्थिती सामना रद्द होणे, दहशतवादशी संबंधित गोष्टी घडणे, नागरीकांचा गोंधळ (दंगली) यांसारख्या अनेक जोखमींमुळे उद्भवलेल्या घटना, यासारख्या गोष्टींमुळे पैश्यांचे किंवा खर्चाचे नुकसान झाल्यास कव्हर केले जाते. केवळ कोव्हिड-19 ला या प्रकारच्या विमा मधुन वगळण्यात आले आहे.